Join us

८६ हजार वीज कामगार बोनससाठी संपावर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 2:13 PM

Strike for bonus : चर्चा फिसकटलयाने १४ नोव्हेंबर रोजी संप

मुंबई : प्रधान ऊर्जा सचिव असिम गुप्ता व तिन्ही कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या समवेत कामगार सघंटनाची बोनसबाबतची चर्चा फिसकटलयाने १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून वीज कंपन्यातील ८६ हजार वीज कामगार संपावर जाणार आहेत.  तिन्ही वीज कंपनीतील कार्यरत कामगार, अभिंयते, अधिकारी सघंटना बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य विघुत मडंळातील विभाजित महानिर्मिती/महापारेषण व महावितरण कंपन्यात कार्यरत ८६ हजार कामगार, अभिंयते व अधिकारी याचे नेतृत्व करणाऱ्या सघंटनाची १२ नोव्हेंबर असिम गुप्ता व तिन्ही कंपन्याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या समवेत चर्चा झाली. मात्र चर्चेत तोडगा निघालेला नाही. महामारी, निसर्ग वादळ व महापुरात जोखीम पत्करुन कामगार,अभिंयते व अधिकारी यांनी काम केलेले आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे या वर्षी बोनस दयावे, अशी मागणी होत आहे. मात्र सरकार व तिन्ही कंपन्याचे व्यवस्थापन बोनस देण्यासाठी टाळाटाळ करत असल्यामुळे संप करण्याचा निर्णय घेण्यात आला असुन राज्यभर निदर्शने करण्यात येत आहे. 

टॅग्स :वीजमहाराष्ट्रमुंबईसरकारभारनियमन