CoronaVirus News: आशिष शेलार म्हणतात, लालबागच्या राजाची ८७ वर्षांची परंपरा खंडित होऊ नये; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 12:59 PM2020-07-02T12:59:16+5:302020-07-02T13:08:29+5:30

गणेशभक्तांची आणि राजाची ताटातूट का करावी?; आशिष शेलारांचा सवाल

87 year old tradition of lalbaugcha raja should not be stopped says bjp leader Ashish Shelar | CoronaVirus News: आशिष शेलार म्हणतात, लालबागच्या राजाची ८७ वर्षांची परंपरा खंडित होऊ नये; पण...

CoronaVirus News: आशिष शेलार म्हणतात, लालबागच्या राजाची ८७ वर्षांची परंपरा खंडित होऊ नये; पण...

googlenewsNext

मुंबई: राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा उत्सव साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. गणेशोत्सवाच्या ११ दिवसांत आरोग्यत्सव साजरा करणार असल्याची माहिती काल मंडळाकडून देण्यात आली. मात्र मंडळाची गणेशोत्सवाची परंपरा खंडित होऊ नये, असं मत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केलं. 



''लालबागचा राजा' गणेशोत्सव मंडळाने सामाजिक उपक्रम राबवण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्यच. पण मंडळाची 87 वर्षांची परंपरा एकाकी खंडित होऊ नये. गणेशभक्तांची श्रद्धा पाहता शासनाच्या सूचना पाळून उत्सव साजरा होऊ शकतो, याचा आदर्श निर्माण करण्याची “हीच ती वेळ”!, असं आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'संकट मोठे आहे, अशावेळी सामान्य माणसाला श्रद्धाच आशादायी ठरते. संकट काळात राजाचे ऑनलाइन दर्शनसुद्धा गणेशभक्तांना दिलासा देऊ शकते! या देशात श्रद्धेला मोल नाही.. श्रद्धा तोलून ही पाहता येत नाही... म्हणून गणेशभक्तांची आणि राजाची ताटातूट का करावी?', असा सवाल शेलार यांनी विचारला आहे.



यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होतो. मात्र मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ८० हजारांच्या जवळपास पोहोचल्यानं यंदाचा उत्सव अतिशय साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय अनेक मंडळांनी घेतला आहे. त्यांचं आशिष शेलारांनी कौतुक केलं आहे. 'सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी शताब्दी वर्षात पारंपरिक गणेशोत्सव अडचणीत आलाय..पण बाप्पा मार्ग काढेल! मुंबईत छोट्या मंडळांसह गणेश गल्ली, चिंतामणी यांनी मुर्तीची उंची कमी करुन, सामाजिक उपक्रमांसह उत्सवाची परंपरा टिकवणार.. त्यांचे कौतुकच!' असं शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून यंदाचा उत्सव रद्द
कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता गणेशोत्सव साजरा न करण्याचा महत्त्वाचा निर्णय मंडळानं घेतला आहे. त्याऐवजी मंडळाकडून आरोग्यसेवेच्या दृष्टीनं महत्त्वाचे उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यामध्ये रक्तदान आणि प्लाज्मादानचा समावेश आहे. यासाठी मंडळाकडून कॅम्पचं आयोजन करण्यात येणार आहे. मंडळानं घेतलेल्या या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठी गर्दी होते. लाखो भाविक राजाच्या दर्शनाला येतात. मात्र सध्याची परिस्थिती पाहता मंडळानं गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी आरोग्यसेवा करण्याचा निर्णय मंडळाकडून घेण्यात आला आहे. लालबागच्या राजाला ८६ वर्षांची परंपरा आहे. 

यंदा गणेशोत्सव साजरा करणार नाही; लालबागचा राजा मंडळाचा ऐतिहासिक निर्णय

'लालबागचा राजा' मंडळाचा 'आरोग्य उत्सव' नेमका आहे काय?... जाणून घ्या

लालबागचा राजा मंडळाने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयावर उद्धव ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Web Title: 87 year old tradition of lalbaugcha raja should not be stopped says bjp leader Ashish Shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.