वसई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या काल झालेल्या बैठकीत भार्इंदर खाडीवरील पुलाच्या ८७५ कोटींच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. हे काम तीन वर्षांत पूर्णत्वास जाणार आहे. गेले ८ वर्ष रखडलेला हा पूल आता मार्गी लागला आहे.विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत वसई विरारचे महापौर नारायण मानकर यांनी उपप्रदेशातील विविध विकासकामांची यादी सादर केली. त्यामध्ये महत्वाचा वसई-भार्इंदर खाडीवरील पूलाच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव समाविष्ट होता.वसई विरार परिसर बृहन्मुंबईशी जोडण्याकरीता राष्ट्रीय महामार्ग ८ हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे या महामार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण व नागरीकांना होणारा त्रास लक्षात घेऊन या खाडीवर पूल बांधणे आवश्यक आहे. मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पाचा विस्तार करण्याचा धोरणात्मक निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ८ वर्षापूर्वी झालेल्या बैठकीत घेतला होता. त्या कामासाठी १०० कोटी रू. इतक्या प्रशासकीय खर्चास मान्यताही देण्यात आली होती. परंतु हे काम विविध कारणामुळे रखडले. आता येत्या ३ वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी ८७५ कोटी ५४ लाख रू. इतकी रक्कम खर्च करण्यात येणार आहे. या कामास प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे लवकरात लवकर पुलाचे काम सुरू होऊन वसईकर नागरीकांना दिलासा मिळणार आहे.४मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ८ वर्षापूर्वी झालेल्या बैठकीत या कामाच्या १०० कोटी रू. खर्चास मान्यताही देण्यात आली होती. परंतु हे काम विविध कारणामुळे रखडले. ४या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. येत्या ३ वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी ८७५ कोटी ५४ लाख रू. इतकी रक्कम खर्च करण्यात येणार आहे.
नव्या भार्इंदर खाडी पुलासाठी ८७५ कोटी
By admin | Published: March 27, 2015 10:54 PM