इमान अहमदच्या शरीरात ७८ स्टोन

By admin | Published: February 20, 2017 04:09 AM2017-02-20T04:09:57+5:302017-02-20T04:09:57+5:30

बेरिएट्रिक सर्जरीसाठी इजिप्तहून भारतात दाखल झालेल्या इमान अहमदच्या शरीरात ७८ स्टोन असल्याचे आढळले आहे. दोन वर्षांनंतर

88 Stone of Iman Ahmed's body | इमान अहमदच्या शरीरात ७८ स्टोन

इमान अहमदच्या शरीरात ७८ स्टोन

Next

मुंबई : बेरिएट्रिक सर्जरीसाठी इजिप्तहून भारतात दाखल झालेल्या इमान अहमदच्या शरीरात ७८ स्टोन असल्याचे आढळले आहे. दोन वर्षांनंतर इमानवर करण्यात येणाऱ्या बेरिएट्रिक सर्जरीसाठी इमानच्या आजारांवर नियंत्रण आणण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे, त्यातील भाग म्हणून इमानच्या शरीरात आढळलेल्या ७८ स्टोनपैकी ३१ स्टोन
येत्या वर्षात काढण्यात येणार
असल्याची माहिती सैफी रुग्णालयातील बेरिएट्रिक सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी दिली.
चर्नीरोड येथील सैफी रुग्णालयात इमानसाठी तयार करण्यासाठी विशेष ‘वन बेड हॉस्पिटल’मध्ये इमानवर उपचार सुरु आहेत. सध्या इमानला केवळ द्रवरुपी आहार सुरु असल्याने तिला असलेले विविध आजार नियंत्रणात आणण्यासाठी मदत होते आहे. शिवाय, इमान सर्व उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहे. तिच्या शरीरातील ३१ स्टोन यावर्षी काढणार आहोत. दोन दिवसांच्या अंतरानंतर एक स्टोन काढण्याचे प्रयत्न असल्याचे डॉ.लकडावाला यांनी सांगितले. स्टोन काढल्यानंतर बेरिएट्रिक सर्जरीतील अडथळे कमी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सध्या इमानच्या उपचारांसाठी १३ डॉक्टरांचा चमू आणि ८ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या २५ वर्षांनंतर इमान पहिल्यांदाच घरातून बेरिएट्रीक सर्जरीसाठी मुंबईतील सैफी रुग्णालयात दाखल झाली आहे. उपचार सुरु झाल्यानंतर इमानचे ३० किलो वजन घटले आहे. मात्र अजूनही तिला बिछान्यावरून हलताही येत नाही. (प्रतिनिधी)
केवळ द्रव आहार
सध्या इमानला केवळ द्रवरुपी आहार देण्यात येत आहे. त्यामुळे काही आजाारांवर नियंत्रण मिळवता येत आहे. तिच्या शरीरातील ३१ स्टोन यावर्षी काढणार आहोत. अशी माहिती डॉ. लकडावाला यांनी दिली.

Web Title: 88 Stone of Iman Ahmed's body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.