राज्यात काेराेनाचे ८८ हजार ५३७ सक्रिय रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:17 AM2020-12-04T04:17:31+5:302020-12-04T04:17:31+5:30
मुंबई : राज्यात बुधवारी काेराेनाच्या ५ हजार ६०० नव्या रुग्णांचे निदान झाले असून १११ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची ...
मुंबई : राज्यात बुधवारी काेराेनाच्या ५ हजार ६०० नव्या रुग्णांचे निदान झाले असून १११ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १८ लाख ३२ हजार १७६ वर पोहोचली असून, मृतांचा आकडा ४७ हजार ३५७ झाला आहे. सध्या राज्यात ८८ हजार ५३७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.५२ टक्के झाले असून मृत्यूचे प्रमाण २.५८ टक्के आहे. बुधवारी दिवसभरात ५ हजार २७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत १६ लाख ९५ हजार २०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ९ लाख ८९ हजार ४९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.६७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४७ हजार ७९१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात आहेत, तर ६ हजार ७३ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.