धरण क्षेत्रात ८९० मिमी पाऊस

By admin | Published: July 29, 2014 12:17 AM2014-07-29T00:17:01+5:302014-07-29T00:17:01+5:30

धरण क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे.

890 mm in the dam area | धरण क्षेत्रात ८९० मिमी पाऊस

धरण क्षेत्रात ८९० मिमी पाऊस

Next

ठाणे : धरण क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे. जिल्ह्यातील आठ धरणांमध्ये मागील २४ तासांच्या कालावधीत ८९०.२० मिमी पाऊस पडला आहे. धरण क्षेत्रात अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊन पाणीसमस्या सुटणार असल्याचे ठाणे जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांनी सांगितले.
भातसा धरणात ४५ मिमी पाऊस पडला असून मोडकसागरमध्ये ५९.६० मिमी, आंध्रात ८०, बारवी धरणात ११२ मिमी, तानसात ६६.६०, वांद्रीत १७५ मिमी पाऊस पडला आहे. धामणी व कवडास धरणांत प्रत्येकी १७६ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: 890 mm in the dam area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.