राज्यात ८,९१२ नवे कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:06 AM2021-06-20T04:06:25+5:302021-06-20T04:06:25+5:30
मुंबई - राज्यात दिवसभरात ८ हजार ९१२ रुग्ण आणि २५७ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे रुग्ण निदानाच्या तुलनेत ...
मुंबई - राज्यात दिवसभरात ८ हजार ९१२ रुग्ण आणि २५७ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे रुग्ण निदानाच्या तुलनेत राज्यात बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मागील चोवीस तासात १० हजार ३७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ५७ लाख १० हजार ३५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७६ टक्के झाले आहे. सध्या राज्यात १ लाख ३२ हजार ५९७ रुग्ण उपचाराधीन आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ९३ लाख १२ हजार ९२० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५.१७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ८ लाख ६ हजार ५०६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ४ हजार ६९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्याचा मृत्यूदर १.९७ टक्के आहे. राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ५९ लाख ६३ हजार ४२० झाली असून, मृतांचा एकूण आकडा १ लाख १७ हजार ३५६ झाला आहे.