सेस इमारतींच्या दुर्घटनेत गमावले ८९४ जणांनी जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 01:31 AM2019-07-17T01:31:29+5:302019-07-17T01:32:10+5:30

डोंगरी येथे मंगळवारी घडलेल्या इमारत दुर्घटनेमुळे मुंबईतील सर्व जुन्या आणि धोकादायक इमारतींंचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

8,984 people lost their lives in Ces building collapse | सेस इमारतींच्या दुर्घटनेत गमावले ८९४ जणांनी जीव

सेस इमारतींच्या दुर्घटनेत गमावले ८९४ जणांनी जीव

googlenewsNext

मुंबई : डोंगरी येथे मंगळवारी घडलेल्या इमारत दुर्घटनेमुळे मुंबईतील सर्व जुन्या आणि धोकादायक इमारतींंचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईतील उपकरप्राप्त इमारती जुन्या असल्याने त्यांची पडझड होत आहे. यातील काही इमारतींची स्थिती सध्या दयनीय झाली आहे. गेल्या ४८ वर्षांमध्ये म्हाडाच्या सेस इमारतींच्या सुमारे ३ हजार ५२८ लहान-मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. या दुर्घटनांमध्ये ८९४ नागरिकांनी जीव गमावला असून, १ हजार ८८३ नागरिक जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. नुकताच मुंबईतील अतिधोकादायक इमारतींचा अहवाल तयार करण्यात आला होता़ यामध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या अहवालानुसार, १९७० ते २०१८ या कालावधीत म्हणजे ४८ वर्षांत पावसाळ्यात इमारती कोसळून आजवर ३ हजार ५२८ अपघात झाले आहेत. यात ८९४ नागरिकांनी जीव गमावला आहे, तर १ हजार ८८३ नागरिक जखमी झाले आहेत. २०१७-१८ वर्र्षी जुन्या इमारती कोसळण्याच्या १९१ घटना घडल्या. यामध्ये ३७ जणांचा मृत्यू झाला, तर पंधरा जण जखमी झाले असल्याचे अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. मुंबई शहरात सर्वाधिक जुन्या आणि धोकादायक इमारती कामाठीपुरा परिसरात आहेत. कामाठीपुरा येथे ५३० उपकरप्राप्त इमारती असून, बहुतेक इमारती शंभर वर्षे जुन्या आहेत. त्यापैकी १२५ इमारतींना टेकूचा आधार आहे, अशी माहिती म्हाडाने अहवालात दिली आहे. ऐन पावसाळ्यात उपकरप्राप्त जीर्ण इमारती कोसळण्याच्या घटना घडतात. यामुळे रहिवाशांना अनेकदा आपत्तीजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागते. रहिवाशांचा त्रास कमी व्हावा आणि जीवितहानी आणि वित्तहानी होऊ नये, यासाठी म्हाडा दुरुस्ती मंडळाकडून दरवर्षी रहिवाशांना इमारत रिकामी करण्याचे आवाहन करण्यात येते. मात्र, आपल्याला वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरांमध्ये खितपत पडावे लागेल, या भीतीने रहिवासी जागा खाली करण्यास नकार देतात. यामुळे जीवितहानी घडण्याची जास्त शक्यता असते.

Web Title: 8,984 people lost their lives in Ces building collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.