राज्यात काेराेनाचे ८ हजार ९९८ नवे रुग्ण, ६० मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:06 AM2021-03-05T04:06:54+5:302021-03-05T04:06:54+5:30

बुधवारच्या तुलनेत गुरुवारी बाधितांचा आकडा काहीसा कमी; बळींची संख्या वाढली लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात गुरुवारी ८,९९८ ...

8,998 new cases of caries in the state, 60 deaths | राज्यात काेराेनाचे ८ हजार ९९८ नवे रुग्ण, ६० मृत्यू

राज्यात काेराेनाचे ८ हजार ९९८ नवे रुग्ण, ६० मृत्यू

Next

बुधवारच्या तुलनेत गुरुवारी बाधितांचा आकडा काहीसा कमी; बळींची संख्या वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात गुरुवारी ८,९९८ नवीन काेराेनाबाधित रुग्णांचे निदान झाले असून, ६० मृत्यूंची नोंद झाली. बुधवारी ९ हजार ८५५ रुग्णांची नोंद, तर ४२ मृत्यू झाले हाेते. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी बाधितांचा आकडा काहीसा कमी झाला असला तरी बळींचा आकडा वाढला आहे. राज्यातील काेरोनाबाधितांची एकूण संख्या २१,८८,१८३ झाली असून, बळींचा आकडा ५२ हजार ३४० आहे. सध्या ८५,१४४ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

दिवसभरात ६,१३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण २०,४९,४८४ बधितांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.६६% एवढे झाले आहे. सध्या मृत्यूदर २.३९ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६५,९६,३०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,८८,१८३ (१३.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,९१,२८८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये, तर ४,१०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

.......................

Web Title: 8,998 new cases of caries in the state, 60 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.