Join us

राज्यात काेराेनाचे ८ हजार ९९८ नवे रुग्ण, ६० मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:06 AM

बुधवारच्या तुलनेत गुरुवारी बाधितांचा आकडा काहीसा कमी; बळींची संख्या वाढलीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात गुरुवारी ८,९९८ ...

बुधवारच्या तुलनेत गुरुवारी बाधितांचा आकडा काहीसा कमी; बळींची संख्या वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात गुरुवारी ८,९९८ नवीन काेराेनाबाधित रुग्णांचे निदान झाले असून, ६० मृत्यूंची नोंद झाली. बुधवारी ९ हजार ८५५ रुग्णांची नोंद, तर ४२ मृत्यू झाले हाेते. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी बाधितांचा आकडा काहीसा कमी झाला असला तरी बळींचा आकडा वाढला आहे. राज्यातील काेरोनाबाधितांची एकूण संख्या २१,८८,१८३ झाली असून, बळींचा आकडा ५२ हजार ३४० आहे. सध्या ८५,१४४ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

दिवसभरात ६,१३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण २०,४९,४८४ बधितांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.६६% एवढे झाले आहे. सध्या मृत्यूदर २.३९ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६५,९६,३०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,८८,१८३ (१३.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,९१,२८८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये, तर ४,१०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

.......................