नवी मुंबईत ९०० पोलीस मित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2015 01:34 AM2015-12-12T01:34:22+5:302015-12-12T01:34:22+5:30

पोलीस महासंचालकांतर्फे सर्व पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस मित्र संकल्पना राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याला अनुसरून नवी मुंबई परिमंडळ-२ मध्ये ९०० जणांना पोलीस मित्र बनविण्यात आले आहे.

9 00 police friends in Navi Mumbai | नवी मुंबईत ९०० पोलीस मित्र

नवी मुंबईत ९०० पोलीस मित्र

Next

पनवेल : पोलीस महासंचालकांतर्फे सर्व पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस मित्र संकल्पना राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याला अनुसरून नवी मुंबई परिमंडळ-२ मध्ये ९०० जणांना पोलीस मित्र बनविण्यात आले आहे.
सामाजिक दायित्व म्हणून पोलीस मित्रांतून त्यांचे सुप्त गुण हेरून त्यांना पोलीस दलात आणण्याचा प्रयत्न राज्यभर सुरू आहे. पोलीस मित्र रात्रीच्या गस्तीत पोलिसांची मदत करणार आहेत. दररोज पोलीस मित्रांच्या ड्युटी लावून त्यांना कामाविषयी माहिती देण्यात येऊन पोलिसांसोबत रात्रीच्या गस्तीत पोलिसांच्या हातात हात देऊन कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. पोलीस मित्रांची सूची तयार झाल्यानंतर प्रत्येक पोलीस ठाणे त्यांच्या सोयीनुसार पोलीस मित्रांची मदत घेणार आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात नवी मुंबई आणि पनवेल व उरण या तालुक्यांचा समावेश होतो. नवी मुंबई महापालिका हद्द परिमंडळ १ आणि पनवेल व उरणचा परिमंडळ-२ मध्ये समावेश होतो.
या हद्दीतील वसाहती, महामार्ग, बाजारपेठा, एमआयडीसी, नवनवीन प्रकल्प त्याचबरोबर वाढते नागरीकरण या तुलनेत पोलिसांचे संख्याबळ कमी आहे. त्यामुळे पोलिसांबरोबरच काम करण्याकरिता पोलीस मित्रांची फळी उभारण्यात आली आहे. प्रत्येक क्षेत्रातील निष्णात पोलीस मित्र म्हणून समावेश करण्याला पोलिसांनी प्राथमिकता दिली आहे. त्यामुळे एखादी घटना घडल्यास त्या क्षेत्रातील पोलीस मित्रांची मदत होणार आहे. परिमंडळ-२ मध्ये पनवेल, नवीन पनवेल, खांदेश्वर, कामोठे, खारघर, कळंबोली, तळोजा, उरण, न्हावा शेवा हे पोलीस ठाणे असून वाढत्या लोकवस्तीला पोलीस यंत्रणा कमी पडत आहे. त्याचबरोबर निवडणुका, मोर्चे, आंदोलने, सभा, व्हीआयपी बंदोबस्त यामध्ये पोलीस सतत व्यस्त असतात. त्यांच्या मदतीला स्थानिक पोलिसांकडून एकूण ९00 पोलीस मित्रांची नियुक्ती करण्यात आली.

Web Title: 9 00 police friends in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.