Join us

जिल्ह्यासाठी ९०० शिक्षक

By admin | Published: May 23, 2014 3:44 AM

जिल्ह्यातील शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी राज्य शासनाच्या शालेय विभागाने ९०० शिक्षक ठाणे जिल्हा परिषदेसाठी मंजूर केले आहेत.

ठाणे : जिल्ह्यातील शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी राज्य शासनाच्या शालेय विभागाने ९०० शिक्षक ठाणे जिल्हा परिषदेसाठी मंजूर केले आहेत. ते लवकरच जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शाळांमध्ये हजर होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्रा.) पांडुरंग कवाणे यांनी ‘लोकमत’ला दिली. प्राथमिक शाळांसाठी सुमारे ११ हजार १५१ शिक्षकांची गरज आहे. परंतु सुमारे दहा हजार शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षकांची ही कमतरता दूर करण्यासाठी ‘टीईटी’ झालेले ९०० शिक्षक जिल्ह्यासाठी मंजूर केले आहेत. यातील सुमारे ८३२ शिक्षक मराठी माध्यमाचे असून उर्दू माध्यमाचे २२ शिक्षक जिल्ह्यात हजर होणार आहे. या भरतीनंतर शिक्षकसंख्या पूर्ण होणार असून कुठेही शिक्षकाची कमतरता भासणार नसल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात शिक्षकांच्या बदल्या होणे अपेक्षित आहेत. पण शासनाच्या आदेशानुसार बदल्यांना स्थगिती मिळालेली आहे. यामुळे शिक्षक बदलीच्या चिंतेपासून सध्या तरी मुक्त झाले आहेत. परंतु जादा वर्गांना शिकवावे लागत असल्यामुळे शिक्षकांची तारांबळ उडत आहे. या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच मंजूर शिक्षक हजर झाल्यास शिक्षकांची कमतरता कायमची दूर होणार आहे. (प्रतिनिधी)