Join us  

‘स्मार्ट’द्वारे ९४२ जणांची निवड

By admin | Published: December 03, 2015 1:25 AM

महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने ‘स्मार्ट’ भरती प्रक्रिया सात महिन्यांत राबविली असून, याकरिता राज्यातील १४ केंद्रांवर एकाच वेळी घेण्यात आलेल्या आॅनलाइन परीक्षेद्वारे ७१

मुंबई : महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने ‘स्मार्ट’ भरती प्रक्रिया सात महिन्यांत राबविली असून, याकरिता राज्यातील १४ केंद्रांवर एकाच वेळी घेण्यात आलेल्या आॅनलाइन परीक्षेद्वारे ७१ हजार ८१६ उमेदवारांपैकी ९४२ उमेदवारांची लिपिक पदांसाठी निवड करण्यात आली.महापालिकेच्या विविध विभागांतील ९४२ लिपिकांची रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली होती, शिवाय वर्तमानपत्रातूनही प्रकाशित करण्यात आली होती. अर्ज करण्याची प्रक्रिया व चलनाद्वारे शुल्क भरणे याबाबत आॅनलाइन सुविधाही पुरविण्यात आली होती. मार्गदर्शनासाठी टोल-फ्री स्वरूपातील विशेष दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित करण्यात आला होता. परीक्षेसाठी प्रवेशपत्र संकेतस्थळावर डाउनलोड करण्यात आले होते. मुंबईसह अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, कल्याण, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, रत्नागिरी, सातारा, सोलापूर व ठाणे या १४ केंद्रांवर एकूण ७१ हजार ८१६ उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली होती.सर्वाधिक म्हणजे, २५ हजार ७३७ उमेदवारांनी मुंबई केंद्रावर तर औरंगाबाद येथून ७ हजार ३३२ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. सर्वात कमी म्हणजे, ८५७ उमेदवारांनी सातारा केंद्रावर परीक्षा दिली होती. (प्रतिनिधी)स्मार्ट प्रक्रियेबद्दल...‘स्मार्ट’ भरती प्रक्रियेची दखल सर्व स्तरातून घेण्यात आली असून, या भरती प्रक्रियेला ‘ई-इंडिया’ या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ‘ई-गव्हर्नमेंट’ चा अत्यंत प्रभावी व लोकापयोगी वापर करणाऱ्या संस्थांना दरवर्षी ‘ई-इंडिया’ पुरस्कारांनी गौरविण्यात येते. याच अंतर्गत या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये पालिकेने राबविलेल्या ‘स्मार्ट’ भरती प्रक्रियेचा गौरव करण्यात आला आहे.