अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी ९५ हजार जागा रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 07:01 AM2018-08-26T07:01:19+5:302018-08-26T07:02:03+5:30

9 5 thousand vacancies vacant for eleventh admission process | अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी ९५ हजार जागा रिक्त

अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी ९५ हजार जागा रिक्त

Next

मुंबई : विशेष फेरीनंतरही असंख्य विद्यार्थी प्रवेशाविना राहिल्याने, ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ यानुसार आॅनलाइन प्रवेश फेरीचा निर्णय केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने घेतला आहे. यासाठी महाविद्यालयांना रिक्त जागा जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार, शनिवारी महाविद्यालयांकडून अकरावीसाठी रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या.

‘प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य’ फेरीसाठी कोट्यासह ९५,३६५ जागा उपलब्ध आहेत. यातील १९,१५२ जागा या इनहाउस, अल्पसंख्याक व व्यवस्थापन कोट्याच्या, तर ७६,२११ या अन्य जागा उपलब्ध आहेत. ‘प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य’ फेरीमध्ये गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांचे तीन गट केले आहेत. प्रत्येक गटाला दिलेल्या मुदतीमध्ये प्रवेशाचा पर्याय प्रथम निवडणाºया विद्यार्थ्याला महाविद्यालयातील रिक्त जागांनुसार प्रथम प्रवेश देण्यात येईल. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत.

शिक्षण विभाग यूट्यूबवर
‘प्रथम येणाºयास प्राधान्य फेरी’ नेमकी कशी आहे, याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. याचेच निराकरण करण्यासाठी अकरावी प्रवेश समितीकडून या फेरीसाठीचे मार्गदर्शन करणारा एक व्हिडीओ बनविण्यात आला असून तो यु ट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. ँ३३स्र२://८ङ्म४३४.ुी/ॠ५ाफे३स्रळढ9ही लिंक असून या व्हिडीओत ही फेरी कशी हाताळावी, प्रवेश कसे निश्चित करावेत याचे मार्गदर्शन केल्याचे उपसंचालक कार्यालय, अकरावी प्रवेश प्रक्रिया अधिकारी अविनाश रणदिवे यांनी सांगितले. मागील वर्षीही असाच प्रयत्न शिक्षण विभागाने केला होता.

फॉर्म नंबर १७ भरण्यासाठी मुदतवाढ
फॉर्म नंबर १७ भरून बाहेरून परीक्षा देणाºया इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना नावनोंदणी अर्जासाठी मुदतवाढ मिळाली आहे. विद्यार्थ्यांनी २६ आॅगस्टपासून ते १० सप्टेंबरपर्यंत आॅनलाइन अर्ज करायचे असून त्याची प्रिंट काढून ११ सप्टेंबरपर्यंत विहीत शुल्क व कागदपत्रांसह अर्जावर नमूद केलेल्या शाळा, महाविद्यालयामध्ये जमा करण्याच्या सूचना शिक्षण मंडळाने दिल्या.

Web Title: 9 5 thousand vacancies vacant for eleventh admission process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.