लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईतील नालेसफाईची कामे पूर्ण झाली असून, नाल्यांमधून १०० टक्के गाळ काढल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. नाल्यांमधून ३१ मेपर्यंत गाळ काढण्याचे उद्दिष्ट होते. मात्र एक आठवडा आधीच ही कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधून एकूण ९ लाख ७९ हजार ८८२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे लक्ष्य होते. दि. २५ मे दुपारी १२पर्यंत झालेल्या नोंदीनुसार नाल्यांतून ९ लाख ८४ हजार ९२७ मेट्रिक टन म्हणजे १००.५१ टक्के गाळ काढला आहे.
नाल्यात कचरा टाकू नयेगाळ काढण्याच्या कामाला दि. ६ मार्चला सुरुवात झाली. यापुढेही नाल्यांतून अधिक गाळ काढण्याचे काम सुरू राहील, अशी माहिती उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी दिली. दरम्यान, गाळ काढलेल्या नाल्यांमध्ये नागरिकांनी कचरा टाकू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
३१ मेपर्यंत गाळ काढण्याचे लक्ष्य होते. मात्र ठरविलेल्या मुदतीच्या एक आठवड्यापूर्वीच गाळ काढण्याचे उद्दिष्ट गाठले. गाळ काढण्याच्या कामांच्या ठिकाणी तसेच गाळ वाहून नेऊन टाकण्यात येत असलेल्या क्षेपणस्थळावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारेही लक्ष ठेवले जात आहे.- पी. वेलरासू, अतिरिक्त पालिका आयुक्त (पी. वेलारासू नावाने फोटो आहे)
आतापर्यंत काढलेला गाळशहर विभाग-३५ हजार ७५६ मेट्रिक टन : ९४.२३%पूर्व उपनगरे-१ लाख १९ हजार ३५९ मेट्रिक टन : १०१.४२%पश्चिम उपनगरे-१ लाख ९४ हजार ६२२ मेट्रिक टन : १००.३६%मिठी नदी-१ लाख ९५ हजार ५६६ मेट्रिक टन : ९०.४७%लहान नाले-३ लाख ८५ हजार ६४४ मेट्रिक टन : १०५.४७%महामार्गांलगतचे नाले-५३ हजार ९७७ मेट्रिक टन : १११.२९%
काढलेला गाळ वाहून नेण्यासाठी वाहनांच्या ५१ हजार ४९० फेऱ्या झाल्या.
छायाचित्रे, व्हिडीओ नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्धमुंबई महानगरपालिकेच्या https://swd.mcgm.gov.in या संकेतस्थळावर नाल्यांतून काढलेल्या गाळाची आकडेवारी, माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ उपलब्ध आहे. आतापर्यंत १ लाख ५४ हजार ५००हून अधिक छायाचित्रे, ७२ हजार ३०० पेक्षा अधिक व्हिडीओ संकेतस्थळावर आहे.