Join us

विमान प्रवाशाच्या बिस्कीट, केकच्या पाकिटात ९ अजगर, २ कॉर्न साप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 9:37 AM

वन्यजीव तस्करीच्या सिंडिकेटचा पर्दाफाश; डीआरआयने केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वन्यजीव तस्करीच्या आणखी एका सिंडिकेटचा डीआरआयने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी बँकॉकहून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तपासणी दरम्यान प्रवाशाच्या बॅगेतील बिस्कीट, केकच्या पाकिटात बॉल प्रजातीचे ९ अजगर आणि कॉर्न प्रजातीचे दोन सर्प मिळून आले आहे. 

डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी २०  तारखेला ही कारवाई केली आहे. प्रवाशाच्या चेक-इन सामानाची तपासणी केल्यानंतर  ९ बॉल अजगर आणि २ कॉर्न सर्प बिस्किट, केकच्या पाकिटांमध्ये लपवून ठेवलेले आढळले. सीमाशुल्क कायदा १९६२ अंतर्गत ते जप्त करण्यात आले. वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो, पश्चिम क्षेत्र नवी मुंबईच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर जप्त केलेल्या प्राण्यांची ओळख पटली.

साप बँकॉकला परत पाठविलेया प्रजाती स्वदेशी नसल्यामुळे त्यांना तात्काळ बँकॉकला परत पाठवण्याचा निर्णय घेतला. अजगर आणि सर्प यांना ताब्यात घेत त्यांना पुन्हा बँकॉकला प्राण्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना पुन्हा विमानाने सुखरूप बँकॉकला पाठवण्यात आले आहे.तस्कर डीआरआयच्या रडारवर वन्यजीवांची तस्करी करणारे डीआरआयच्या रडारवर असून, त्यानुसार विमानतळावर झाडाझडती आणि तपासणी करण्यात येत आहे. यापूर्वीदेखील वेळोवेळी अशा तस्करांचा बेड्या ठोकण्यात डीआरआयला यश आले आहे.

टॅग्स :तस्करी