Join us

खंडणीखोर पत्रकारांसह ९ तोतया पोलिसांना मनोरमध्ये अटक

By admin | Published: April 03, 2015 10:51 PM

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बेलपाडा, माऊंटन हॉटेल जवळ गुटखा भरलेला टेम्पो अडवून दोन पत्रकारांसहीत ९ तोतया पोलीसांनी टेम्पोमालकाकडे १५

मनोर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बेलपाडा, माऊंटन हॉटेल जवळ गुटखा भरलेला टेम्पो अडवून दोन पत्रकारांसहीत ९ तोतया पोलीसांनी टेम्पोमालकाकडे १५ लाखाची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून मनोर पोलीसांनी खंडणीच्या गुन्ह्यात ९ जणांना अटक केली आहे.मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून दररोज गुजरातवरून मुंबईला गुटखा भरून नेणाऱ्या वाहनांचा सुळसुळाट सुरू असून गेल्या महिन्यात मनोर पोलीसांनी गुटखा भरलेले दोन टेम्पो पकडले. यावरूनच कल्पना सुचून आपणही पोलीस बनून गुटख्याचे टेम्पो अडवून पैसे कमवू, या उद्देशाने दोन दिवस अगोदर ९ जणांच्या टोळक्याने तोतया पोलीस बनून महामार्ग क्र. ८ वर मुंबई वाहिनीवर असलेला माऊंटन हॉटेल जवळ गुटखा भरून जाणारा टेम्पो अडविला. टेम्पोचालकाला डांबून ठेवले. आपण पोलीस व पत्रकार आहोत असे टेम्पोमालकाला सांगून १५ लाख घेऊन या असे सांगितले. मी मारोती पाटील सहा. पोलीस निरिक्षक मनोर पोलीस ठाण्यातून बोलतोय. त्यावरुन टेम्पो मालकाच्या व्यवस्थापनाने मनोर पोलीस ठाण्यात फोन केला. यामुळेच तोतया पोलिसांचा शोध लागला. खरे पोलीस फाऊंटन हॉटेलवर गेले असता त्यांनी पळायला सुरूवात केली. मात्र, चारही बाजूने पोलीसांनी सापळा रचून ९ तोतया पोलीसांसह पत्रकार आणि ग्रामपंचायत सदस्याला पकडले.तोतया पोलीसांची भूमिका करणारे खंडणीखोर सुलतान महमद दमणवाला (४०), रोषन मदन जहा (२९), इब्राहीम शहजादा अलसारी (२९), ईब्राहीम अजहर खान (२९), वसीम रज्जाक दमणवाला (३१), परवेझ रीयाज खान (३३), शब्बीर महमदहाणीक दमणवाला (३१), हुसेन जाकीरया शेख (४१), अताउल्ला कासीम मार्कीडया (३९) अशी यांची नावे असून सर्व बोईसर, तारापूरचे राहणारे आहेत. तोतया पोलिसांना अटक केल्याची माहिती मिळताच मनोर पोलीस ठाण्यात काही राजकीय पक्षाचे नेते त्यांना सोडविण्याच्या हेतूने आले. मात्र मारोती पाटील यांनी गुन्हा दाखल करून पालघर न्यालालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. (वार्ताहर)