मुंब्रा, औरंगाबाद येथून एटीएसने ताब्यात घेतले ९ संशयित अतिरेकी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 06:30 AM2019-01-23T06:30:39+5:302019-01-23T06:32:08+5:30

प्रजासत्ताक दिनाच्या आधी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने मुंब्रा व औरंगाबादमधून ९ संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.

 9 suspected terrorists detained by ATS from Mumbra, Aurangabad | मुंब्रा, औरंगाबाद येथून एटीएसने ताब्यात घेतले ९ संशयित अतिरेकी

मुंब्रा, औरंगाबाद येथून एटीएसने ताब्यात घेतले ९ संशयित अतिरेकी

Next

मुंबई/ठाणे : प्रजासत्ताक दिनाच्या आधी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने मुंब्रा व औरंगाबादमधून ९ संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे. ते केरळ येथील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या औरंगाबाद शाखेच्या संपर्कात असल्याचे समजते. या टोळीकडून आक्षेपार्ह सामग्रीही जप्त केल्याची माहिती आहे. औरंगाबादची शाखा सलमान खान (रा. मुंब्रा, ठाणे) चालवत होता. सलमानसह त्याच्या संपर्कात असलेले मुंब्रा येथील मोहम्मद मझहर शेख, मोहसीन खान आणि फहाद शेख व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. मोहम्मद शेखच्या घरात मंगळवारी पहाटे छापा घालून मोबाइल, कागदपत्रे व लॅपटॉप पोलिसांनी ताब्यात घेतले.
या सर्वांनी ‘इसिस’कडून प्रशिक्षण घेतल्याचा संशय आहे. पॉप्युलर फ्रंट ही संस्था देशविघातक असल्याचे समजते. ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या वृत्तास दुजोरा दिला, परंतु कारवाई करणारी यंत्रणा वेगळी असल्यामुळे आपल्याकडे कारवाईचा तपशील नसल्याचेही ते म्हणाले.
>त्यांचेही कनेक्शन
दोन वर्षांपूर्वी मुंबई एटीएसने मुंब्रा भागातून मुदब्बीर शेख या इसिसच्या भारताच्या कमांडरला अटक केली होती. नंतर तेथूनच निझाम शेख उर्फ उमर याला बेड्या ठोकल्या. त्याचा आणि ९ जणांचा संबंध आहे का, या दिशेनेही एटीएस तपास करत आहे.
>औरंगाबादमध्ये यांना घेतले ताब्यात
औरंगाबाद येथून मोहंमद मोहसीन सिराजउल्लाह खान, त्याचा मेहुणा काजी सरफराज, मोहंमद तकीउल्लाह सिराज खान यांना ताब्यात घेतले. मोहसीनचा दुसरा मेहुणा मोहंमद मुशाहेदुल इस्लाम यालाही ताब्यात घेतल्याचे समजते.

Web Title:  9 suspected terrorists detained by ATS from Mumbra, Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.