मुंबईत ९ हजार १४८ रुग्ण उपचाराधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:06 AM2021-06-27T04:06:02+5:302021-06-27T04:06:02+5:30
मुंबई : मुंबईत शनिवारी ६४८ रुग्णांची नोंद झाली असून, १५ मृत्यूची नोंद झाली आहे. १९१९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला ...
मुंबई : मुंबईत शनिवारी ६४८ रुग्णांची नोंद झाली असून, १५ मृत्यूची नोंद झाली आहे. १९१९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असून, तो ७१३ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सध्या ९ हजार १४८ सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत ६४८ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा सात लाख १९ हजार ६१०वर पोहोचला आहे. दिवसभरात १५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १५ हजार ३८३वर पोहचला आहे. शनिवारी १९१९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या ६ लाख ९२ हजार ७८७वर पोहोचली आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ७२३ दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या १४ चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत, तर ८८ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज ३३ हजार ७५९, तर आतापर्यंत एकूण ७० लाख ११ हजार ९४७ चाचण्या करण्यात आल्या आहेत.