Join us

दादरच्या चौपाटीवर ९ हजार टन कचरा, १० हजारांहून अधिक स्वयंसेवक सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2023 2:38 PM

उपक्रमात दादर आणि मुंबईच्या इतर भागातील स्थानिक नागरिक, निसर्गप्रेमी तरुण आणि पर्यावरण, जागरूक स्वयंसेवक आणि शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आमचे महासागर, आमची जबाबदारी हा किनारपट्टी स्वच्छता उपक्रम दादर समुद्रकिनारी ‘दादर बीच क्लीन अप’ या नावाने महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेना आणि सुगी ग्रुपच्या वतीने राबविण्यात आला होता. उपक्रमात दादर आणि मुंबईच्या इतर भागातील स्थानिक नागरिक, निसर्गप्रेमी तरुण आणि पर्यावरण, जागरूक स्वयंसेवक आणि शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग होता. आजपर्यंत १० हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी या मोहिमेत भाग घेतला आहे. ४५० हून अधिक किनाऱ्यांवरून ९ हजार टनांहून अधिक प्लास्टिक आणि इतर कचरा या सर्व समुद्रकिनाऱ्यांवरून काढण्यास मदत केली आहे.

समुद्रप्रेमी जय शृंगारपुरे यांच्या प्रयत्नातून समुद्रकिनारे स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. आमच्या किनारपट्टी स्वच्छता अभियानाचे हे सहावे यशस्वी वर्ष आहे. दरवर्षी पर्यावरणाविषयी जागरूक लोकांचा या उपक्रमात सहभाग वाढत आहे, हे आशादायी चित्र आहे, असे शृंगारपुरे यांनी सांगितले. तर महासागर आणि जलस्रोत यांसह शहरी पायाभूत सुविधांच्या प्रत्येक घटकांचे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून चांगले संरक्षण व जतन करणे आवश्यक आहे. यासाठी पर्यावरणावर भर दिल्याचे निशांत देशमुख यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :मुंबई