शेतकऱ्यांच्या खात्यांत कर्जमाफीचे ९०३५ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 00:11 IST2020-03-06T00:11:14+5:302020-03-06T00:11:21+5:30
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी प्रसिध्द केल्यानंतर अवघ्या ५ दिवसात १५ लाख ४५ हजार शेतकऱ्यांचे प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यांत कर्जमाफीचे ९०३५ कोटी
मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी प्रसिध्द केल्यानंतर अवघ्या ५ दिवसात १५ लाख ४५ हजार शेतकऱ्यांचे प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. यापैकी १३.८८ लाख कर्जखात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम शासनाकडून जमा करण्यात आली असून ती सुमारे रुपये ९०३५ कोटी रुपये आहे.
योजनेच्या अंमलबजावणीमध्ये योजनेअंतर्गत अतिशय पारदर्शक पध्दतीने शेतकºयांची गावनिहाय यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात आपले सरकार सेवा केंद्रावर व बँकांच्या शाखांमध्ये येणाºया शेतकºयांचे प्रमाणिकरण अवघ्या दोन ते तीन मिनिटात होत असल्यामुळे सर्व ठिकाणी शेतकरी बांधवांमध्ये उत्साह व समाधान व्यक्त होत असल्याची माहिती सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी दिली
प्रमाणिकरण केल्यानंतर शेतकºयास योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम व्यापारी बँकांच्या बाबतीत अवघ्या २४ तासात व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्याबाबत ४८ तासात थेट त्यांच्या कर्जखात्यावर जमा होत आहे. यासाठी आवश्यक निधी शासनाने तातडीने उपलब्ध करुन दिला आहे.