फुकट्यांकडून ९४ कोटींची दंडवसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 05:54 AM2019-12-21T05:54:10+5:302019-12-21T05:54:26+5:30

१९ लाख प्रवाशांना पकडले; पश्चिम रेल्वे प्रशासनाची कारवाई

90 crore penalty from without ticket passengers | फुकट्यांकडून ९४ कोटींची दंडवसुली

फुकट्यांकडून ९४ कोटींची दंडवसुली

googlenewsNext

मुंबई : विनातिकीट प्रवास करणाऱ्या १९ लाखांपेक्षा जास्त फुकट्या प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून एकूण ९४ कोटींची दंडवसुली पश्चिम रेल्वे प्रशासनाने केली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर, २०१९ या आठ महिन्यांच्या कालावधीत ही कारवाई करण्यात आली.


अनेक प्रवासी तिकीट न काढताच प्रवास करतात. त्यांना लगाम घालण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. याच कारवाईअंतर्गत एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान अशा १९ लाख १९ हजार प्रकरणांची नोंद करण्यात आली. यातून ९३ कोटी ९६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. यातील नोव्हेंबर महिन्यात विनातिकीट प्रवास करणाºया २ लाख १४ प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून १० कोटी ५९ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर रेल्वे परिसरात फिरणाºया ३३६ गर्दुल्ल्यांसह ३६३ अनधिकृत फेरीवाल्यांना पकडण्यात आले.


याच कालावधीत रेल्वे परिसरातील २ हजार ६८ गर्दुल्ले, ४ हजार ११८ अनधिकृत फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली. ज्या प्रवाशांनी, फेरीवाल्यांनी दंड भरला नाही, अशा १ हजार १९ जणांना तुरुंगात पाठविण्यात आले.


नियमित कारवाईसोबत राबवली विशेष मोहीम
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले की, एप्रिल ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान नियमित कारवाईसोबतच पश्चिम रेल्वे प्रशासनकाडून विशेष मोहीमही राबविण्यात आली. या विशेष मोहिमेंतर्गत रेल्वे परिसरात तपासणीअंती विविध गुन्ह्यांमध्ये १ हजार ७०९ जणांना पकडून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला.

Web Title: 90 crore penalty from without ticket passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.