राज्यातील ९० डॉक्टर देणार राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 06:09 AM2020-10-01T06:09:51+5:302020-10-01T06:10:04+5:30
सरकारी अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप
मुंबई : कोरोनाकाळात अहोरात्र सेवा देणाऱ्या डॉक्टरांना सरकारी अधिकारी त्रास देत असल्याचा आरोप करत राज्यातील ९० डॉक्टर राजीनामे देणार आहेत. काही जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांना अरेरावी तसेच अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने त्यांचे खच्चीकरण होत आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने (मॅग्मो) आरोग्य विभागाला पत्र लिहून अशा अधिकाºयांवर कारवाईची मागणी केली आहे.
राज्यातील राजपत्रित वैद्यकीय अधिकाºयांचे नेतृत्व करणाºया मॅग्मो संघटनेने आरोग्यमंत्री आणि आरोग्य विभागाला लिहिलेल्या पत्रात म्हटले, सरकारी अधिकाºयांच्या त्रासाला कंटाळून डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. डॉक्टरांना होणाºया त्रासाबद्दल वरिष्ठ अधिकाºयांना वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न होतो. मात्र ते गांभीर्याने दखल घेत नाहीत. प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड यांनी दिला. या विषयावर आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य संचालिका डॉ. साधना तायडे यांच्यासोबत बैठक झाल्याची माहितीही त्यांनी दिली.