Join us

९० टक्के हॉटेल कर्मचाऱ्यांनी घेतला पहिला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:12 AM

मुंबई : मिशन बिगीन अगेनअंतर्गत राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट आता रात्री १० वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेसह सुरू झाली ...

मुंबई : मिशन बिगीन अगेनअंतर्गत राज्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंट आता रात्री १० वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेसह सुरू झाली आहेत. हॉटेल संघटनांनी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. ९० टक्के हॉटेल कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला आहे.

आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले की, रेस्टॉरंटला पहिल्या दिवशी ५० ते ५५ टक्के प्रतिसाद मिळाला. पण आठवडाभरात प्रतिसाद वाढेल, अशी अपेक्षा आहे. कोरोना काळात मोठे नुकसान झाले आहे. ते आताच भरून येणार नाही. त्यासाठी दोन ते तीन वर्षांचा काळ लागेल. हॉटेल १.३० पर्यंत सुरू ठेवल्यास नुकसान लवकर भरून येण्यास मदत होईल. आम्ही हॉटेल कर्मचाऱ्यांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्यात यावे, यासाठी प्रयत्नशील आहोत. संघटनेकडून लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्याला कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ९० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.