फाटकांमुळे 90 लोकल गाडय़ांना बसतोय फटका
By Admin | Published: November 25, 2014 02:06 AM2014-11-25T02:06:20+5:302014-11-25T02:06:20+5:30
मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर धावणा:या लोकल गाडय़ांना पाच फाटकांमुळे तर हार्बरवरील लोकल गाडय़ांना एका फाटकामुळे मोठा फटका बसत असल्याचे समोर आले आहे.
मुंबई : मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर धावणा:या लोकल गाडय़ांना पाच फाटकांमुळे तर हार्बरवरील लोकल गाडय़ांना एका फाटकामुळे मोठा फटका बसत असल्याचे समोर आले आहे. या फाटकांमुळे दररोज धावणा:या तब्बल 90 लोकल गाडय़ांच्या वक्तशीरपणाचा बो:या वाजत असल्याचे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिका:याकडून सांगण्यात आले. त्यामुळे या फाटकांऐवजी प्रस्तावित असणारे रोड ओव्हरब्रीज लवकरात लवकर बनवण्यासाठी मध्य रेल्वे प्रयत्नशील आहे.
डोंबिवली स्थानकात नुकताच महिला प्रवाशांनी रेल रोको केला होता. टिटवाळाहून डोंबिवली स्थानकात येणारी लोकल ठाकुर्ली फाटकामुळे उशिराने आली आणि त्यामुळे महिला प्रवाशांनी एकच गोंधळ घातला. लोकलला बसणारा फटका हा एक फाटकामुळे नसून अन्य स्थानकांजवळ असणा:या फाटकांमुळे बसत असल्याचे रेल्वेतील वरिष्ठ अधिका:यांकडून सांगण्यात आले. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर कल्याण, ठाकुर्ली, आंबिवली, दिवा, कळवा स्थानकाजवळ असलेल्या फाटकांमुळे लोकल गाडय़ांच्या वक्तशीरपणातच बिघाड होत आहे. तसेच कुर्ला हार्बर मार्गावरील फाटकामुळे हीच परिस्थिती उद्भवत असल्याचे सांगण्यात आले.
दिवा, कळवा, ठाकुर्ली स्थानकांजवळ असणारे फाटक मध्य रेल्वेसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहेत. दिवा येथील फाटक जवळपास चार ते पाच मिनिटे उघडले जाते. ठाकुर्ली आणि कळवाचे फाटक 20पेक्षा जास्त वेळा उघडते. ही दोन्ही फाटके तीन ते चार मिनिटे उघडतात. या फाटकांजवळ रोड ओव्हरब्रीज प्रस्तावित आहेत. (प्रतिनिधी)
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सध्या मध्य रेल्वेच्या बिघडलेल्या वक्तशीरपणात 1क् दिवसांत सुधारणा करण्याच्या सूचना रेल्वे अधिका:यांना केल्या होत्या. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत ठाणो ते कल्याणदरम्यान रुळांवरून उतरणा:या लोकल गाडय़ांच्या अपघातांमुळे यादरम्यान वेगावर नियंत्रण बसवले होते. मेन लाइनवर असणारे फाटक आणि त्यातच ठाणो ते कल्याणदरम्यान लोकल गाडय़ांवर असणारी वेगमर्यादा पाहता मध्य रेल्वेने प्रथम ही वेगमर्यादा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 20 टक्के तरी गाडय़ांच्या वक्तशीरपणात सुधारणा होईल, अशी आशा रेल्वे अधिका:यांना आहे.