Join us

६९ टक्के मुंबईकरांनी दिले पालिकेला ‘फाइव्ह स्टार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 2:28 AM

‘खड्डे दाखवा, पाचशे रुपये मिळवा’ योजना; बंगळुरू, हैदराबाद, ठाणे म्हणते, आमच्याकडेही उपक्रम राबवा!

मुंबई : मुंबई महापालिकेने मुंबई शहरासह उपनगरात राबविलेल्या ‘खड्डे दाखवा, पाचशे रुपये मिळवा’ या अभिनव योजनेला मुंबईकरांनी तुफान प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे महापालिकेनेदेखील दाखल झालेल्या तक्रारींनंतर २४ तासांत संबंधित खड्डे बुजविण्यावर भर दिला. परिणामी, ९१.३ टक्के एवढे खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला असतानाच दुसरीकडे मुंबईकरांनीदेखील अशा प्रकारचा अभिनव उपक्रम राबविल्याने मुंबई महापालिकेला तब्बल ‘फाइव्ह स्टार’ रेटिंग दिले आहे. तर दुसरीकडे अशाच प्रकारची योजना आमच्याकडेही राबविण्यात यावी; अशा आशयाचे म्हणणे मांडत बंगळुरू, हैदराबाद आणि ठाणेकरांनी ‘खड्डे दाखवा; पाचशे रुपये मिळवा’ या योजनेत रस दाखविला आहे.

१ हजार ४४५ खड्ड्यांपैकी १ हजार ३१९ खड्डे म्हणजे ९१.३ टक्के खड्डे हे दाखल झालेल्या तक्रारींनंतर २४ तासांत बुजविले गेले. उर्वरित खड्डेदेखील काही मिनिटांसह काही तासांच्या फरकाने बुजविण्यात आले. खड्डे बुजविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर मुंबईकरांकडून अभिप्रायदेखील मागविण्यात आले. त्यानुसार, ६९ टक्के मुंबईकरांनी मुंबई महापालिकेच्या या अभिनव योजनेसह खड्डे बुजविण्यासंदर्भातील कारवाईला ‘फाइव्ह स्टार’ रेटिंग दिले. तर ४ टक्के मुंबईकरांनी ‘थ्री’ आणि ‘फोर स्टार’ रेटिंग दिले.सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई महापालिकेने खड्डे बुजविण्याबाबत हे जे काही आव्हान स्वीकारले; त्याचेही नागरिकांनी कौतुक केले. केवळ कौतुक नाही, तर ट्विटरवर संबंधितांनी अशीच योजना बंगळुरू, हैदराबाद आणि ठाणे महापालिकेत राबविण्यात यावी, अशी मागणीही केली.अशी सुरू झाली योजनाच्पावसाळ्याचे चार महिने संपून आॅक्टोबर महिना उलटला तरी मुंबई खड्ड्यात होती. परिणामी, १ नोव्हेंबरपासून मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी महापालिकेने नामी शक्कल लढविली. ‘खड्डे दाखवा, पाचशे रुपये मिळवा’ अशी योजनाच महापालिकेने हाती घेतली. तत्पूर्वी आॅक्टोबर महिन्यात भांडुप येथे रस्ते विभागाची यासंबंधी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत रस्त्यांवरील खड्डे ३१ आॅक्टोबरपर्यंत बुझविण्यात यावेत, असे निर्देश देण्यात आले.च्१ नोव्हेंबरपासून मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे दिसणार नाहीत, असा दावा पालिकेने केला; आणि खड्डे दिसलेच तर मात्र ‘खड्डे दाखवा, पाचशे रुपये मिळवा’ ही योजना सुरू केली. योजना सुरू होताच महापालिकेकडे खड्ड्यांसाठी तक्रारी दाखल होऊ लागल्या.अंतिम निर्णय रस्ते विभागाचाज्या तक्रारदारांनी रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी केल्या, मात्र २४ तासांत संबंधित खड्डा बुजविला गेला नाही, अशा तक्रारदारांना पाचशे रुपये देण्याबाबत विलंब होत असल्याच्या तक्रारीदेखील सातत्याने येत आहेत. यासंदर्भात विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, संबंधित तक्रारदारांना पाचशे रुपये मिळतील; यात काही शंकाच नाही. ते त्वरित मिळत नसले तरी एक किंवा दोन दिवसांच्या कालावधीत मिळतील. पण यासंदर्भातील निर्णय रस्ते विभाग घेत असून, त्यांच्याकडून याबाबतची कारवाई केली जाईल.बक्षीस मिळविण्यासाठी या अटी-शर्ती लागूच्खड्डा १ फूट लांब आणि ३ इंच खोल पाहिजे.च्तक्रारीनंतर २४ तासांत खड्डा भरला गेला तर पैसे मिळणार नाहीत.च्‘खड्डे दाखवा, पैसे मिळवा’ या योजनेसाठी ट८इटउस्रङ्म३ँङ्म’ीा्र७’३ या अ‍ॅपवर खड्ड्यांची तक्रार नोंदवावी लागेल.तक्रारीनंतर खड्डे बुजविण्यात आल्यासंदर्भातील १ नोव्हेंबरपासूनचे सिटीजन रेटिंग (टक्के)

टॅग्स :मुंबईस्वच्छ भारत अभियान