मुंबई मेट्रो-३ मार्गाचे ९० टक्के काम पूर्ण; रात्री २ वाजता एकनाथ शिंदेंनी केली भूयारी मार्गाची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 12:16 PM2023-05-10T12:16:36+5:302023-05-10T12:18:35+5:30

कुलाबा-वांद्रे- सिप्झ  हा मुंबई मेट्रो मार्ग-३ मुंबईसाठी प्रस्तावित असलेला पहिला आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्ग आहे.

90 percent of Mumbai Metro-3 route completed; CM Eknath Shinde inspected the underground route | मुंबई मेट्रो-३ मार्गाचे ९० टक्के काम पूर्ण; रात्री २ वाजता एकनाथ शिंदेंनी केली भूयारी मार्गाची पाहणी

मुंबई मेट्रो-३ मार्गाचे ९० टक्के काम पूर्ण; रात्री २ वाजता एकनाथ शिंदेंनी केली भूयारी मार्गाची पाहणी

googlenewsNext

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री मुंबईमेट्रो-३ टप्प्याच्या चर्चगेट ते विधानभवन या भुयारी मार्गाच्या कामाची पाहणी केली. रात्री २ वाजताच्या सुमारास भुयारी मार्गातून चालत जाऊन एकनाथ शिंदेंनी या प्रकल्पाची पाहणी केली आणि कामाची संपूर्ण माहिती घेतली.

कुलाबा-वांद्रे- सिप्झ  हा मुंबई मेट्रो मार्ग-३ मुंबईसाठी प्रस्तावित असलेला पहिला आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्ग आहे. शहरात वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी तसेच वाहतुकीच्या पर्यायी सुविधेसाठी हा मार्ग महत्त्वाचा असून त्याचे काम गतीने सुरू आहे. मुंबई महानगरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची मुंबईकरांची गरज मेट्रोच्या माध्यमातून गरज पूर्ण होणार आहे. मेट्रो-३ मार्गाचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले असून येत्या डिसेंबरअखेर मेट्रो रेल्वेचा हा टप्पा पूर्ण होईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मेट्रो ३ मार्ग हा मेट्रो -१, २,६ आणि ९ यांना तसेच मोनोरेलला जोडला जाणार आहे. याशिवाय, उपनगरी रेल्वे मार्गाला चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याशिवाय मुंबईतील विमानतळांनाही हा मार्ग जोडला जाणार आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच या मेट्रो -३ मार्गामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे तसेच रस्त्यावरील सहा लाख वाहने कमी होतील असा विश्वास व्यक्त करून या मार्गाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत तर दुसरा टप्पा जून २०२४ पूर्वी पूर्ण केला जाईल, अशी माहिती देखील एकनाथ शिंदे यांनी दिली. 

Web Title: 90 percent of Mumbai Metro-3 route completed; CM Eknath Shinde inspected the underground route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.