९० टक्के जनता आर्थिक चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 04:42 AM2020-06-04T04:42:41+5:302020-06-04T04:43:25+5:30
लॉकडाउनचा परिणाम : सर्वेक्षणातील निष्कर्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविड-१९ लॉकडाउन व त्यामुळे आलेल्या आर्थिक मंदीमुळे ९० टक्के जनता सध्या आपल्या उत्पन्न आणि बचतीबाबत चिंतित आहेत, अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.
डिजिटल आर्थिक व्यवहार करणाऱ्या इंडिया लेण्ड्स या संस्थेने ५००० व्यक्तींचे हे सर्वेक्षण केले आहे. यापैकी ८२ टक्के मंडळींनी आपण उत्पन्न आणि खर्चाची कशीतरी तोंडमिळवणी करतो आहे, अशी कबुली दिली आहे. तर ८४ टक्के व्यक्तींनी खर्चात कपात केली आहे, असे सांगितले. मात्र ९० टक्के मंडळींनी भविष्यातील उत्पन्न
आणि बचत होईल का नाही, याबाबत काळजी व्यक्त केली
आहे.
याच सर्वेक्षणात खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी कर्ज काढावे लागेल, अशी शक्यता ७२ टक्के जनतेने बोलून दाखविली. अनेक कंपन्यांनी पगार व कर्मचारी कपात केली आहे. त्यामुळे कर्ज हप्ते, अत्यावश्यक सेवांची बिले, शाळा /महाविद्यालयांची फी, उपकरणांची दुरुस्ती यासाठी कर्ज काढावे लागेल, असे या मंडळींनी सांगितले. यापैकी ७६ टक्के जनतेने आपण सध्या कुठलीही गुंतवणूक करू शकत नाही, असे कबूल केले, तर ४० टक्के लोकांनी फक्त अत्यावश्यक खर्च करण्याचे ठरविले आहे.