Join us

मुंबईतील २४९ बचत गट संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 1:12 AM

शालेय पोषण आहार योजनेला हरताळ : कंत्राटाची कार्यपद्धती चुकीची

मनोहर कुंभेजकर।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना वितरित करणाऱ्या आहाराच्या कंत्राटाची कार्यपद्धती चुकीची आहे. या परिपत्रकातील जाचक अटीनुसार बचत गटांना मिळणारी देयके थेट त्यांच्या खात्यात जमा न होता, शाळेच्या बँक खात्यात जमा होत असल्याने, मुंबईतील २४९ बचत गटांवर उपासमारीची पाळी आली आहे. सदर परिपत्रकातील विविध जाचक अटींमुळे महिला बचत गट, महिला मंडळे व महिला संस्था यांच्यावर बेकारीची व कर्जबाजारीपणाची वेळ आली आहे. त्यामुळे महिला बचत गटांवर होणारा अन्याय दूर होण्यासाठी लक्ष घालून सदर परिपत्रक रद्द करावे व महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक ४च्या नगरसेविका सुजाता पाटेकर यांनी शिवसेना आमदार सुनील प्रभू व आमदार विलास पोतनीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी अन्न शिजविणाºया यंत्रणेने शाळा स्तरावर पुरवठा केलेल्या आहाराच्या वजनानुसार अदा करण्यात यावीत, असे परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार सदर देयके शाळेतील मुख्याध्यापकाने लाभार्थी संस्थेनुसार परिशिष्ट ‘अ’ विहित नमुन्यात प्रपत्र तयार करून स्वाक्षरी करून महानगरपालिका कार्यालयास सादर करणे, सदर देयके अदा करण्याकरिता परिशिष्ट ‘ब’ विहित नमुन्यामध्ये प्रपत्र स्वाक्षरी करून सादर करणे असे निर्देश दिले आहेत. असे नगरसेविका पाटेकर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.याबातची देयके खरे तर अन्न शिजविणाºया यंत्रणेने (संस्थेने) करायची असतात. मात्र, द.गो.जगताप शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी शालेय पोषण आहाराची देय तयार करणे, सदर पोषण आहाराच्या देयकानुसार शाळांच्या खात्यावर देयके जमा करण्याची कामे आदी कामेसुद्धा शिक्षकांवर, मुख्याध्यापकांवर लादली असल्याचा आरोप नगरसेविका सुजाता पाटेकर यांनी केला. अन्न (पुरवठा) शिजविणाºया संस्था या कंत्राटदार असल्याने, पोषण आहाराची देय रक्कम देयकानुसार शाळांच्या खात्यावर जमा न करता, संस्थांच्या चालकांच्या खात्यात आहाराची देयके जमा करावी, अशी मागणी केली आहे.

अधिक आहारामुळे अन्नाची नासाडीपरिपत्रकात इयत्ता १ली ते ५वी मधील विद्यार्थ्यांना ४०० ते ५०० ग्रॅम, इयत्ता ६वी व ७वीच्या विद्यार्थ्यांना ७०० ते ७५० ग्रॅम वजनाइतका आहार देण्याचे सुस्पष्ट निर्देश आहेत. मात्र, १ली ते ५वी मधील विद्यार्थी ४०० ते ४५० ग्रॅम इतका आहार सेवन करू शकत नाहीत. त्यामुळे अन्नाची नासाडी होऊन ते वाया जाते, याकडे सुजाता पाटेकर यांनी लक्ष वेधले आहे.