Join us

उपचाराअंती ९० वर्षीय आजीबाईंनी केली कोरोनावर यशस्वी मात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 6:05 AM

संडे अँकर। सायन रुग्णालयातून डिस्चार्ज; डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : धारावीत राहणाऱ्या ९० वर्षीय आजीबार्इंनी कोरोनावर मात केली. सायन रुग्णालयात तत्काळ आणि योग्य पद्धतीने मिळालेल्या उपचारांमुळे हे शक्य झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.सायन रुग्णालयात ४ मे रोजी दाखल केलेल्या या आजीबार्इंना रक्तदाबाचा त्रास होता. रुग्णालयात दाखल करण्याआधीच ४ दिवसांपासून त्यांना ताप, कोरड्या खोकल्याचाही त्रास सुरू झाला होता. त्यामुळे श्वासोच्छ्वास नीट करता येत नव्हता. त्या रुग्णालयात आल्या तेव्हा त्यांची प्रकृती खूपच ढासळली होती, अशी माहिती सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.त्यांना आठवडाभर सततचा आॅक्सिजन पुरवठा आणि अ‍ॅण्टीबायोटिक्स देण्यात आले. कोरोना झाल्यामुळे त्यावरही उपचार सुरू होते.आठवडाभराच्या उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. आॅक्सिजन मास्कशिवाय बोलू लागल्या. काही दिवसांतच त्यांनी कोरोनावर मात केली.वॉर्डमधील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतल्याने आजीबार्इंनी त्यांचे आभार मानले आणि हसतमुखाने रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्याची महिती डॉ. भारमल यांनी दिली.आजीबाई बºया झाल्याचे समाधानआजीबाई रुग्णालयात आल्या तेव्हा त्यांची प्रकृती खूपच ढासळली होती. त्वरित त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्यांना कोरोनामुक्त होऊन घरी जाताना पाहणे ही समाधानाची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या