Join us  

बेस्टच्या ताफ्यात येणार 900 इलेक्ट्रिक डबलडेकर, आरामदायी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 12:53 PM

बस न देणाऱ्या कंपनीला बजावली कारणे दाखवा नोटीस

.लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईकरांच्या सेवेसाठी ‘बेस्ट’ उपक्रमाने ९०० इलेक्ट्रिक डबलडेकर बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी २०० बसगाड्यांचा पुरवठा स्वीच मोबॅलिटी कंपनीकडून होणार आहे. स्वीच मोबॅलिटीकडून १२ बसगाड्यांचा पुरवठा झाला आहे. मात्र, कॉसिस मोबॅलिटी कंपनीकडून एकही बसचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

साध्या डबलडेकर भंगारातमुंबईच्या रस्त्यांवरून धावणारी साधी डबलडेकर बस लवकरच नामशेष होणार आहे.  सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात १९  डबलडेकर बसगाड्या असून, या बसगाड्यांची वयोमर्यादा संपुष्टात आल्याने त्या भंगारात काढल्या जातील. 

२०० पैकी १२जुन्या गाड्यांच्या जागी नवीन ९०० वातानुकूलित डबल डेकर बसगाड्या ताफ्यात घेण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात २०० बसगाड्यांपैकी १२ बसगाड्यांचा पुरवठा स्वीच मोबॅलिटी कंपनीकडून करण्यात आला असून, उर्वरित बसगाड्या टप्प्याटप्प्याने येणार आहेत. तर ७०० बसगाड्या काॅसिस मोबॅलिटी कंपनीकडून घेण्यात येणार आहे.

कारवाई का करण्यात येऊ नये?वर्ष उलटून गेले तरी या बसगाड्यांचा पुरवठा काॅसिस मोबॅलिटीकडून न करण्यात आलेला नाही. त्यामुळे काॅसिस मोबॅलिटी कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. डबलडेकर बसगाड्यांचा पुरवठा करण्यात उशीर झाला असून, कंपनीवर का कारवाई करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात येणार आहे.

मुंबईकरांचा प्रतिसादप्रदूषण टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाने भाडेतत्त्वावरील वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात १२ इलेक्ट्रिक डबलडेकर बसगाड्या असून, त्यातून मुंबईकर गारेगार प्रवास करत आहेत. या दुमजली एसी डबलडेकर गाड्यांना मुंबईकरांचा प्रतिसादही उत्तमप्रकारे मिळत आहे.

टॅग्स :बेस्टमुंबई