समृद्धी महामार्गावर पहिल्या टप्प्यात ९०० रुपये टोल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 07:26 AM2022-12-03T07:26:25+5:302022-12-03T07:27:20+5:30

५२० किमीसाठी प्रतिकिमी १.७३ रुपये आकारणी

900 rupees toll on Samriddhi Highway in the first phase! | समृद्धी महामार्गावर पहिल्या टप्प्यात ९०० रुपये टोल!

समृद्धी महामार्गावर पहिल्या टप्प्यात ९०० रुपये टोल!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) बांधण्यात येत असलेल्या समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते नागपूर या ५२० किलोमीटरच्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी लोकार्पण करण्यात येणार असतानाच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना प्रतिकिलोमीटरसाठी १ रुपये ७३ पैसे एवढा टोल भरावा लागणार आहे. तर याच मार्गावरून संपूर्ण प्रवासासाठी वाहनचालकांना एकूण ९०० रुपये एवढा टोल भरावा लागणार आहे.

शिर्डी ते नागपूर हे अंतर ५२० किलोमीटर आहे. ताशी १२० किलोमीटर वेगाने या मार्गावरून प्रवास करता येणार असून, यासाठी पाच तास लागणार आहेत. जितका प्रवास तितका टोल त्यानुसार  आकाराला जाईल. ५२० किमीच्या मार्गात १९ टोल नाके कार्यान्वित आहेत. हे टोलनाके १९ एक्झिट पॉइंटवर आहेत. टोलनाक्यावर सुविधा देण्याचे काम सुरू आहे. महामंडळाकडून लोकार्पण कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. महामार्गावरील नागपूर येथील वायफड टोलनाक्याजवळ लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे.

 

Web Title: 900 rupees toll on Samriddhi Highway in the first phase!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.