९ हजार झाडांचे मियावाकी पद्धतीने रोपण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:06 AM2021-02-25T04:06:27+5:302021-02-25T04:06:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे पर्यायी वृक्षारोपण अंतर्गत मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे पर्यायी वृक्षारोपण अंतर्गत मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन व फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र यांनी करार केला आहे. या अंतर्गत गोरेगाव परिसरातील इनॉर्बिट मॉल जवळ सुमारे ३ हजार चौरस मीटर भूखंडावर ९ हजार झाडांचे मियावाकी पद्धतीने रोपण केले जाणार आहे.
अत्यल्प कालावधीत घनदाट वन निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांनी दिली. येथील मोहिमे अंतर्गत तीन महिन्यांच्या कालावधीत विविध स्थानिक प्रजाती जसे काथ, कडूलिंब, आवळा, बकुळ, सीता अशोक, चिंच, अर्जुन, बदाम इत्यादी ९ हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. पुढील दोन वर्ष या झाडांची मशागत केली जाईल.