मोबाइलसाठी गमावले ९० हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:06 AM2021-05-10T04:06:39+5:302021-05-10T04:06:39+5:30
मुंबई : इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील मोबाइल विक्रीची जाहिरात बघून त्यावर विश्वास ठेवून मोबाइल मागविणे एका महिलेला चांगलेच महागात ...
मुंबई : इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील मोबाइल विक्रीची जाहिरात बघून त्यावर विश्वास ठेवून मोबाइल मागविणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. मोबाइलसाठी या महिलेची ९० हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी ताडदेव पोलीस अधिक तपास करीत आहेत.
------------------------------------
ताेतया पाेलिसांनी वृद्धेला लुटले
मुंबई : तोतया पोलिसांनी बोलण्यात गुंतवून एका ७० वर्षीय वृद्धेच्या सोन्याच्या बांगड्या पळविल्याची घटना भायखळ्यात घडली. याप्रकरणी वृद्ध महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात भायखळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पाेलीस अधिक चाैकशी करीत आहेत.
...................................
परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या एलएलएमच्या पाचव्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया १० एप्रिलपासून सुरू झाली आहे. त्यानंतर आता १७ मे रोजी मुख्य परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक महिनाही वेळ मिळणार नसल्याने परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.
..............................