Join us

नववर्षाच्या पूर्वसंध्येला ९०२५ वाहनांची झाडाझडती, २४१० विनाहेल्मेट चालकांवर कारवाई

By मनीषा म्हात्रे | Published: January 01, 2024 6:14 PM

Mumbai Police News: मुंबई पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे नववर्ष स्वागताची पूर्व संध्या जल्लोषात पार पडली. यादरम्यान मुंबई पोलिसांनी ९०२५ वाहनांची झाडाझडती घेत २४०१ विनाहेल्मेट चालकांवर कारवाई केली आहे. या कारवाईत २२९ तळीरामांचे सेलिब्रेशन पोलीस कोठडीत झाले.

मुंबई - मुंबई पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे नववर्ष स्वागताची पूर्व संध्या जल्लोषात पार पडली. यादरम्यान मुंबई पोलिसांनी ९०२५ वाहनांची झाडाझडती घेत २४०१ विनाहेल्मेट चालकांवर कारवाई केली आहे. या कारवाईत २२९ तळीरामांचे सेलिब्रेशन पोलीस कोठडीत झाले.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषाने स्वागत करण्यासाठी मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा ओटे. यावेळी मुंबई शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये चोख बंदोबस्त नेमण्यात आला होता. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर व  विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती व पोलीस सह आयुक्त (का. व सु.) सत्यनारायण चौधरी यांनी शहरातील विविध ठिकाणी भेटी देऊन सर्व घडामोडींवर लक्ष ठेवले. शहरातील सर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त विशेष शाखा, अपर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, २२ पोलीस उपायुक्त, ४५ सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ४५० पोलीस निरीक्षक, १६०१ इतर अधिकारी व ११५०० पोलीस अंमलदार यांनी एकत्रित सर्व मुंबई शहरात नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला चोख बंदोबस्त करुन कुठलाही अनुचित प्रकार होवू दिला नाही.

बंदोबस्ता दरम्यान सर्व पोलीस ठाण्याच्या  हद्दीत ११२ ठिकाणी विशेष नाकाबंदी करत ९०२५ दुचाकी / तीनचाकी चार चाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्या एकुण २४१०, विरूध्द दिशेने वाहन चालवणाऱ्या एकुण ३२० व बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या  एकूण ८० वाहन चालकांवर मोटार वाहन कायदयान्वये कारवाई करण्यात आली. तसेच मद्यधुंद अवस्थेत  वाहन चालवणाऱ्या एकुण २२९ मद्यपी वाहन चालकांवर कलम १८५ मोटार वाहन कायदा अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तसेच प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने मर्मस्थळे व संवेदनशिल ठिकाणे अशा एकुण ६१८ ठिकाणी तपासणी करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणे, गर्दीचे ठिकाणे, समुद्र किनारे व विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता. 

टॅग्स :मुंबई पोलीसनववर्षवाहतूक पोलीस