विविध देशांतून ९३४ प्रवासी मुंबई विमानतळावर दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:06 AM2021-03-22T04:06:02+5:302021-03-22T04:06:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाकाळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने राबविलेल्या वंदे भारत अभियानांतर्गत शनिवारी विविध ...

934 passengers from various countries arrive at Mumbai Airport | विविध देशांतून ९३४ प्रवासी मुंबई विमानतळावर दाखल

विविध देशांतून ९३४ प्रवासी मुंबई विमानतळावर दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाकाळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने राबविलेल्या वंदे भारत अभियानांतर्गत शनिवारी विविध देशांतून ८ हजार ५८७ प्रवासी मायदेशी परतले. त्यापैकी ९३४ प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (मुंबई) दाखल झाल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयातर्फे देण्यात आली.

मुंबईत शनिवारी दाखल झालेल्या प्रवाशांमध्ये न्यूयॉर्कहून आलेल्यांची संख्या सर्वाधिक म्हणजेच २१८ इतकी आहे. त्याखालोखाल लंडनहून २११, मस्कत १५६, दुबई १४५, दम्माम १२४, तर जेद्दाहहून ८० प्रवासी मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत.

इंग्लंड, युरोपीय देश, मध्य पूर्व आशिया, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील येथून येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस संस्थात्मक विलगीकरण आणि सात दिवस गृहविलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. मात्र, काही प्रवाशांना यात सूटही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

६५ वर्षांवरील व्यक्ती, प्रसुतीकाळ जवळ आलेल्या गर्भवती महिला, पाच वर्षे वयाखालील मुलांचे पालक, गंभीर आजारग्रस्त व तत्काळ उपचारांची गरज असलेले रुग्ण, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्ती, तसेच अत्यावश्यक शस्त्रक्रियेसाठी मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा यात समावेश आहे. या प्रवाशांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी संबंधित कागदपत्रे विमानतळावर सादर करावी लागतील.

Web Title: 934 passengers from various countries arrive at Mumbai Airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.