मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरासह लगतच्या परिसरात दमदार पाऊस कोसळत असून, आता मुंबईला पाणी पुरवठा करत असलेले तलाव ब-यापैकी भरले आहेत. आजच्या घडीला या सातही तलावांत एकूण ९३.७४ टक्के एवढा जलसाठा असून, तुळशी, विहार, मोडक सागर आणि तानसा हे चार तलाव तर केव्हाच ओव्हर फ्लो झाले आहेत. आता केवळ तीन तलाव भरणे शिल्लक असून, यात अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसाचा समावेश आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे साडेचौदा दशलक्ष लीटर आहे. जलाशयांतील पाणीसाठ्यामध्ये चांगली वाढ झाल्याने, महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या लागू असलेली २० टक्के पाणीकपात आता १० टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. म्हणजे आता १० टक्के इतकीच पाणीकपात लागू राहणार आहे. २१ ऑगस्टपासून हा बदल लागू झाला आहे. काही दिवसांपूर्वी जलाशयांमध्ये पुरेसा जलसाठा नसल्याच्या कारणाने ५ ऑगस्टपासून मुंबईच्या पाणीपुरवठ्यामध्ये २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र मागील काही दिवसांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया मुख्य जलस्त्रोतांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पर्जन्यवृष्टी झाली. यामुळे जलसाठा वाढला आहे.
-------------------------
तलावातील उपयुक्त पाण्याचा साठा टक्क्यांतअप्पर वैतरणा ८३.२०मोडक सागर १००तानसा ९९.४२मध्य वैतरणा ९५.२९भातसा ९४.०७विहार १०० तुळशी १००एकूण ९३.७४