मुंबईच्या तलावांत ९३.७४% जलसाठा; चार तलाव ओव्हर फ्लो
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 01:00 AM2020-08-24T01:00:58+5:302020-08-24T01:01:18+5:30
मुंबईला पाणीपुरवठा करणाºया सात तलावांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे साडेचौदा दशलक्ष लीटर आहे.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरासह लगतच्या परिसरात गेले काही दिवस दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव बऱ्यापैकी भरले आहेत. आजच्या घडीला या सातही तलावांत एकूण ९३.७४ टक्के जलसाठा असून, तुळशी, विहार, मोडक सागर आणि तानसा हे चार तलाव केव्हाच ओव्हर फ्लो झाले आहेत. आता केवळ अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा हे तीनच तलाव भरणे शिल्लक आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाºया सात तलावांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे साडेचौदा दशलक्ष लीटर आहे. काही दिवसांपूर्वी जलाशयांमध्ये पुरेसा जलसाठा नसल्याने ५ ऑगस्टपासून मुंबईच्या पाणीपुरवठ्यामध्ये २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र, मागील काही दिवसांत मुंबईला पाणीपुरवठा करणाºया मुख्य जलस्रोतांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पर्जन्यवृष्टी झाल्याने तलावांतील जलसाठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे पालिका क्षेत्रामध्ये सध्या लागू असलेली २० टक्के पाणीकपात १० टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. २१ ऑगस्टपासून हा बदल लागू झाला आहे.