Join us

मेट्रो-३ चे ९५ टक्के भुयारीकरण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:07 AM

कफ परेड ते सीएसएमटीपर्यंतचे काम पूर्ण, कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ऐतिहासिक वारसा इमारतीजवळील मेट्रो-३ ...

कफ परेड ते सीएसएमटीपर्यंतचे काम पूर्ण, कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ऐतिहासिक वारसा इमारतीजवळील मेट्रो-३ च्या पॅकेज-१ चे ९५ टक्के भुयारीकरण मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे पूर्ण करण्यात आले. या पॅकेजअंतर्गत भुयारीकरणाचा ३७ वा टप्पा पार पडला.

हुतात्मा चौक ते सीएसएमटी हा डाउनलाइन मार्गाचा ५६९ मीटर भुयारीकरणाचा टप्पा एकूण ४१८ रिंग्जच्या साहाय्याने १०६ दिवसांत पूर्ण झाला. या भुयारीकरणासह पॅकेज-१ मधील कफ परेड ते सीएसएमटी दरम्यान एकूण २.९ किमी लांबीचे डाउनलाइनचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे. सूर्या-२ या टनेल बोअरिंग मशीनद्वारे हे भुयारीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

ऐतिहासिक वारसा इमारती व समुद्रानजीक भुयारीकरण करणे जिकिरीचे आहे. पॅकेज-१ चे आतापर्यंत ९६ टक्के भुयारीकरण पूर्ण झाले, असे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी सांगितले. पॅकेज-१ अंतर्गत कफ परेड, विधान भवन, चर्च गेट आणि हुतात्मा चौक या मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. या पॅकेज अंतर्गत भुयारीकरणाचे सहा टप्पे पूर्ण झाले. तर मेट्रो-३ प्रकल्पासाठी आतापर्यंत एकूण ९५ टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे.

-------------

पॅकेज-१

- कफ परेड ते विधान भवन

- विधान भवन ते चर्चगेट

- चर्चगेट ते हुतात्मा चौक

- हुतात्मा चौक ते सीएसएमटी