९५ टक्के लोकल सुरू; मात्र सुरक्षेला प्राधान्य - मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 01:48 AM2021-02-15T01:48:18+5:302021-02-15T01:48:44+5:30
Mumbai Local : गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने केलेल्या सोयीसुविधांबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्याशी साधलेला संवाद.
- नितीन जगताप
मुंबई : कोरोनामुळे बंद असलेली लोकल मर्यादित वेळेत सर्वांसाठी खुली झाली आहे. गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने केलेल्या सोयीसुविधांबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्याशी साधलेला संवाद...
गेल्या दहा महिन्यांपासून सर्वसामान्यासाठी मर्यादित वेळेत रेल्वे सुरू झाली आहे. कशा प्रकारे व्यवस्थापन केले जात आहे ?
- मध्य रेल्वेच्या एकूण गाड्यांपैकी ९५ टक्के क्षमतेने गाड्या सुरू आहेत. सर्व तिकीट खिडक्या सुरू आहेत, सर्व एटीव्हीम सुरू आहे. यूटीएस ॲप सुरू करण्यात आले आहे. आरपीएफ आणि जीआरपीला गर्दी होऊ नये यासाठी कारवाई करण्यास सांगितले आहे. कोणीही विनातिकीट प्रवास करू नये म्हणून तिकीट तपासणी मोहीम सुरू केली आहे. फुकट्या प्रवाशांवर कारवाई केल्याने गर्दी कमी होईल. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी नियम पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही नवीन उपक्रम सुरू आहेत का?
-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नवीन उपक्रम केले आहेत. फेबीआय सिस्टीम सुरू केली आहे. सीएसएमटी फ्लॅब गेट लावले आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांतील प्रवाशांचे तिकीट तपासले जाते, तापमान तपासले जाते. अर्जुन नावाचा रोबो तयार केला. तो तापमान तपासतो आणि निगराणी ठेवतो. तिकीट तपासनिसाकडे नेकबँड पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टीम दिली आहे.
रेल्वे प्रवाशांना काय आवाहन कराल ?
- प्रवाशांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, आदी सर्व नियमांचे पालन करावे. रेल्वे तुमच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक संभाव्य पाऊल उचलत
आहे. प्रवाशांनीही आम्हाला सहकार्य करावे.