मुंबईतील ९५ टक्के दुकाने बंद; पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:06 AM2021-04-07T04:06:50+5:302021-04-07T04:06:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. सोमवार ते शुक्रवार कठोर निर्बंध आणि शनिवार, रविवारी पूर्ण लॉकडाऊन असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर ९५ टक्के दुकाने बंद होती. ग्राहक किराणा दुकाने, सुपर मार्केट, मॉलमध्ये खरेदीसाठी गर्दी करत आहेत.
फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शाह म्हणाले की, कोरोना पार्श्वभूमीवर दुकाने बंद होती. दक्षिण मुंबईत पूर्णपणे बंद तर उपनगरांत सकाळी काही दुकाने सुरू करण्यात आली; पण नंतर बंद करण्यास सांगितले. मुंबईतील एकूण दुकानांपैकी ९५ टक्के दुकाने बंद होती. दरम्यान, अनेक ठिकाणी दुकाने बंद केली असली तरी फेरीवाले त्यांचा माल विकत होते, त्यामुळे त्यावरही बंदी असायला हवी. तसेच ई-कॉमर्स कंपन्या अत्यावश्यक वस्तूंसोबत इतर मालाचीही विक्री करत आहेत. दुकाने बंद असल्याने माल पडून राहील. त्या कंपन्यांना केवळ अत्यावश्यक सेवेतील वस्तू विकण्याचे बंधन असावे, असेही ते म्हणाले.