वायफाय सुपरफास्ट, डाउनलोडिंग सुस्साट, मुंबईच्या स्टेशनांवर महिन्यात वापरला 9.50 लाख जीबी डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 03:15 PM2018-08-02T15:15:53+5:302018-08-02T15:16:37+5:30

डीजिटल इंडियात इंटरनेट युजर्संची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कमी किमतीत आणि मोफत डेटा मिळविण्यासाठी मोबाईल इंटरनेट युजर्स नेहमीच प्रयत्न करत असत

9.50 lakh GB data used from mumbai local train station | वायफाय सुपरफास्ट, डाउनलोडिंग सुस्साट, मुंबईच्या स्टेशनांवर महिन्यात वापरला 9.50 लाख जीबी डेटा

वायफाय सुपरफास्ट, डाउनलोडिंग सुस्साट, मुंबईच्या स्टेशनांवर महिन्यात वापरला 9.50 लाख जीबी डेटा

Next

मुंबई - डीजिटल इंडियात इंटरनेट युजर्संची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कमी किमतीत आणि मोफत डेटा मिळविण्यासाठी मोबाईल इंटरनेट युजर्स नेहमीच प्रयत्न करत असतात. तर महानगरीय शहरांमधील मोफत वाय-फाय सेवेचा लाभ तरुणांकडून मोठ्या प्रमाणात घेतला जातो. मुंबईतील रेल्वे स्थानकावर जून महिन्यात तब्बल 9.50 लाख जीबी डेटा वापरण्यात आला आहे. म्हणजेच रेल्वे स्थानकावरुन दररोज 30 हजार जीबी डेटा फुकट्यांकडून वापरण्यात येत आहे. 

मुंबईतील 28 रेल्वे स्थानकावर हायस्पीड गुगल वायफाय सेवा कार्यरत आहे. या 28 स्थानकांवरुन जून महिन्यात तब्बल 9.50 लाख जीबी डेटा वापरण्यात आला आहे. त्यापैकी कल्याण रेल्वे स्थानकावर सर्वाधिक डेटा वापरण्यात आला. कल्याण रेल्वे स्थानकावरुन जून महिन्यात 4 लाख 22 हजार 149 लोकांनी गुगल वायफाय वापरण्यासाठी लॉग इन केले आहे. म्हणजेच, आताही जवळपास 14 हजार प्रवासी फुकटचा डेटा वापरत आहेत. कल्याणनंतर ठाणे स्थानकाचा नंबर येतो. येथून दररोज 13 हजार प्रवासी मोफत इंटरनेटचा लाभ घेतात. 

पश्चिम रेल्वेचा विचार केल्यास अंधेरी रेल्वे स्थानकावरुन सर्वाधिक 11 हजार प्रवासी दररोज मोफत वायफाय मिळवण्यासाठी गुगल लॉग इन करतात. सर्वाधिक वायफाय इंटरनेट डेटा वापरणाऱ्या टॉप 10 स्थानकांमध्ये मध्ये रेल्वेचे 6 आणि पश्चिम रेल्वेच्या 4 स्थानकांचा समावेश आहे. दरम्यान, रेलटेलने गुगलच्या मदतीने देशातील 400 रेल्वे स्थानकांवर सार्वजनिक वायफाय सेवा सुरु केली आहे. त्यामध्ये प्रति युजरकडून 350 एमबी पेक्षा अधिक इंटरनेट वापरण्यात येते. 

या 10 रेल्वे स्थानकावर सर्वाधिक वायफाय वापरले जाते 
कल्याण, ठाणे, अंधेरी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला, दादर (सेंट्रल), बोरीवली, दादर (वेस्टर्न), बांद्रा आणि डोंबिवली. 
 

Web Title: 9.50 lakh GB data used from mumbai local train station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.