हिवाळ्यात मुंबईतून रोज ९६४ विमानांच्या फेऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 06:33 IST2024-10-30T06:33:28+5:302024-10-30T06:33:57+5:30
गेल्या वर्षीच्या हिवाळ्याच्या हंगामापेक्षा ही संख्या २ टक्के अधिक आहे.

हिवाळ्यात मुंबईतून रोज ९६४ विमानांच्या फेऱ्या
मुंबई : मुंबईविमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनीदेखील आपल्या फेऱ्यांत वाढ केली आहे. यानुसार हिवाळ्याच्या हंगामात विविध विमान कंपन्यांकडून आठवड्याकाठी ३,३७२ विमान फेऱ्या होणार आहेत. यानुसार दिवसाकाठी ९६४ विमान फेऱ्या मुंबईतून होणार आहेत.
गेल्या वर्षीच्या हिवाळ्याच्या हंगामापेक्षा ही संख्या २ टक्के अधिक आहे. या हंगामात देशांतर्गत मार्गावर २,३६१ तर आंतरराष्ट्रीय मार्गावर १,०११ विमान फेऱ्या होणार आहेत. मुंबईतून एकूण ११५ विमानतळांसाठी ही विमानसेवा उपलब्ध असणार आहे. २७ ऑक्टोबर ते २९ मार्च या कालावधीमध्ये या फेऱ्या होणार आहेत. दरम्यान, आजच्या घडीला देशांतर्गत मार्गांवर मुंबईतून सर्वाधिक ४७ टक्के विमान फेऱ्या या इंडिगो कंपनीतर्फे होत आहेत. एअर इंडिया १९ टक्के, विस्ताराच्या माध्यमातून १७ टक्के विमान फेऱ्या होत आहेत.