Join us

राज्यात काेराेनाच्या नव्या ९,६७७ रुग्णांची नाेंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात शुक्रवारी नऊ हजार ६७७ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात शुक्रवारी नऊ हजार ६७७ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ६० लाख १७ हजार ३५ झाली आहे. दिवसभरात दहा हजार १३८ रुग्ण बरे झाल्याने कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ५७ लाख ७२ हजार ७९९ झाली आहे. सध्या एक लाख २० हजार ७१५ सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यातील मृत्युदर २ टक्के इतका असून, दिवसभरात १५६ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत एक लाख २० हजार ३७० नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

* एकूण रुग्णसंख्या ७३ने कमी

आज रहिवासी पत्त्यांनुसार रुग्ण इतर जिल्ह्यांमध्ये दाखविण्यात आल्याने तसेच दुहेरी नोंद असलेले रुग्ण वगळल्याने मुंबईतील एकूण रुग्णसंख्येत चार हजार ४६८ची घट झाली आहे तर राज्यातील एकूण रुग्णसंख्या ७३ने कमी झाली.