Join us

पालिकेच्या तिजोरीत आॅनलाईन कर भरणामुळे ९७.६२ कोटी जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 1:13 PM

केंद्र सरकाराने कॅशलेस व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यास सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिकेने देखील ठाणेकर करदात्या नागरीकांसाठी आॅनलाईन कर भरणा पध्दत सुरु केली आहे. त्यानुसार ठाणेकरांनी देखील कॅशलेस व्यवहाराला पंसती देत आतापर्यंत ९७.६२ कोटींचा मालमत्ता कराचा भरणा केला आहे.

ठाणे : कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली होती. तसेच कोरोना काळातील मालमत्ता कर माफ करावा अशी मागणीही लावून धरण्यात आली होती. असे असतांनाही आता महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ताकरापोटी ३२२.२५ कोटी जमा झाले आहेत. दुसरीकडे केंद्राकडून कॅशलेस व्यवहारांना देखील प्रोत्साहन दिले जात आहे. याचाच एक भाग म्हणून ठाणेकरांनी देखील यंदा कॅशलेस व्यवहाराला पंसती देत आपल्या कराचा भरणा देखील त्याच पध्दतीने केला आहे. त्यानुसार आतापर्यंत तब्बल ९० हजार करदात्यांनी आपला कर भरणा हा कॅशलेस पध्दतीने केला असल्याची माहिती समोर आली आहे. यातून पालिकेच्या तिजोरीत ९७.६२ कोटींचा भरणा झाला आहे. तर पालिकेच्या संकलन केंद्रात देखील एटीएम, डेबीट, क्रेडीट कार्डची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याने पालिकेच्या करभरणा केंद्रावर होणारी गर्दी देखील कमी झाली आहे.                कोरोना काळातही ठाणेकरांनी महापालिकेच्या हाकेला साथ देत मालमत्ता कराची रक्कम भरली आहे. महापालिकेमार्फत शहरातील संपूर्ण ५ लाख २ हजार करदात्यांना देयके अदा करण्यात आली होती. त्यातील २.२६ लाख कर दात्यांनी आपला कर भरला आहे. तर मागील वर्षी याच कालावधीत ३५० कोटींची वसुली झाली होती. यंदा ३२२ कोटींहून अधिकची वसुली झाली आहे. त्यातही ९० हजार करदात्यांनी आॅनलाईन पध्दतीने कर भरणा करुन पालिकेला सहकार्य केल्याचे दिसून आले आहे. केंद्राने कॅशलेस व्यवहार करण्यासाठी नागरीकांना प्रात्सोहन दिले आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेने देखील करदात्यांना आपल्या कराची रक्कम भरता यावी या उद्देशाने कॅशलेस व्यवहाराला पसंती दिल्याचे दिसून आले आहे. त्यातही कोरोनामुळे नागरीकांना सोशल डिस्टेसींगचे पालन करता यावे, त्यांनी घरबसल्या आपले व्यवहार करावेत म्हणून पालिकेने यंदा कर भरणा पध्दतीत सुलभता आणल्याचे दिसून आले आहे.त्यानुसार आतापर्यंत ९० हजार करदात्यांनी आॅनलाईन पध्दतीने ९७.६२ कोटी रुपयांचा क र भरणा केला आहे. तसेच २१ संकलन केंद्रावर एटीएम, डेबीट, क्रेडीट कार्डद्वारे देखील मालमत्ता कर जमा करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याने याद्वारे ८४ लाखांचा कर भरणा झाला आहे. तर मागील वर्षी आॅनलाईन पध्दतीचा केवळ १६ टक्केच नागरीकांनी फायदा घेतला होता. यंदा मात्र हे प्रमाण ३१ टक्यांवर आले आहे.आॅनलाईनद्वारे जमा झालेला करप्रभाग समिती            जमा झालेली रक्कम कोटीतउथळसर                        ११.२४नौपाडा - कोपरी             १६.९०कळवा                           ०.७८दिवा                              २.०१वागळे इस्टेट                  ३.६१लोक .सावरकर नगर      ४.१९वर्तक नगर                     १८.९२माजिवडा मानपाडा        ३५.११---------------------------------एकूण                         ९७.६२ कोटी 

टॅग्स :ठाणेठाणे महापालिकाआयुक्त