मुंबईच्या तलावांत ९७.८६ टक्के पाणी साठा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 03:36 PM2020-09-06T15:36:08+5:302020-09-06T15:38:08+5:30
दमदार बरसात
मुंबई : ऑगस्ट महिन्यात पावसाने दमदार बरसात केली आहे. याचा परिणाम म्हणून मुंबईलापाणी पुरवठा करणारे सातही तलाव काठोकाठ भरले आहेत. आजघडीला सातही तलावांत मिळून ९७.८६ टक्के पाणी साठा आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता ही सुमारे साडेचौदा दशलक्ष लीटर आहे.
जलाशयांतील पाणीसाठ्यामध्ये चांगली वाढ झाल्याने, महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या लागू असलेली पाणीकपात कमी करण्यात आली आहे. जलाशयांमध्ये पुरेसा जलसाठा नसल्याच्या कारणाने ५ ऑगस्टपासून मुंबईच्या पाणीपुरवठ्यामध्ये २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. मात्र मागील काही दिवसांत मुंबईला पाणीपुरवठा करणा-या मुख्य जलस्त्रोतांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पर्जन्यवृष्टी झाली. यामुळे जलसाठा वाढला आहे.
--------------
तुळशी तलाव २७ जुलै रोजी दुपारी १२ वाजल्यापासून भरू न वाहू लागला.
विहार तलाव ५ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजल्यापासून भरून वाहू लागला.
मोडक सागर तलाव १८ ऑगस्टपासून रात्री साडेनऊ वाजल्यापासून भरून वाहू लागला.
तानसा तलाव २० ऑगस्टपासून सायंकाळी ७ वाजल्यापासून भरून वाहू लागला.
--------------
तलाव निहाय उपयुक्त पाण्याचा साठा टक्क्यांत
अप्पर वैतरणा ९६.८१
मोडक सागर ९९.९९
तानसा ९९.२६
मध्य वैतरणा ९६.८३
भातासा ९७.७०
विहार १००
तुळशी १००