Join us

विमानतळावरून ९२ लाखांचे सोने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 5:32 AM

विविध ठिकाणांहून मुंबईत आलेल्या वेगवेगळ्या तिघा प्रवाशांना अटक करून अवैधरीत्या आणलेले सुमारे ९२ लाख किमतीचे सोने जप्त केले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी रात्री हवाई गुप्तचर विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.

मुंबई - विविध ठिकाणांहून मुंबईत आलेल्या वेगवेगळ्या तिघा प्रवाशांना अटक करून अवैधरीत्या आणलेले सुमारे ९२ लाख किमतीचे सोने जप्त केले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्टÑीय विमानतळावर शनिवारी रात्री हवाई गुप्तचर विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.जेट एअरवेजच्या विमानाने गुवाहाटीहून मुंबईला आलेल्या बंटी दिनेशलाल रामचंदानी याला संशयावरून ताब्यात घेऊ न झडती घेतली. त्याने सुमारे १२०२ ग्रॅमचे सोन्याचे ६ तुकडे एका कापडात गुंडाळून गुप्तांगाजवळ लपवून आणल्याचे आढळून आले. या सोन्याची अंदाजे किंमत ३४ लाख १६ हजार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आंतरराष्टÑीय विमानतळावर आलेल्या अन्य दोघा प्रवाशांच्या झडतीतून सुमारे ५८ लाख रुपये किमतीचे सोने मिळाले. या तिघांना अटक करण्यात आली असून सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :सोनं