लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वीकेंड लॉकडाऊन असतानाही कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध शनिवारी ९८ गुन्हे दाखल करण्यात आले. यात, विनामास्क फिरणाऱ्यांसह लॉकडाऊन असतानाही दुकानांंचे शटर उघडणाऱ्यांंचे प्रमाण अधिक आहे.
मुंबईत २० मार्च २०२० ते १० एप्रिलपर्यंत विविध पोलीस ठाण्यांत २८ हजार २०७ गुन्हे दाखल झाले असून, उत्तर विभागात सर्वाधिक १० हजार ८६९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. वीकेंड लॉकडाऊन असल्याने शनिवारी पोलिसांच्या कारवाईचा वेग पुन्हा वाढलेला पाहायला मिळाला. यात, कोरोना रुग्ण संबंधित (१०), हॉटेल आस्थापना (८), पानटपरी (३), इतर दुकाने (२१), सार्वजनिक गर्दी (१०), अवैध वाहतूक (३) आणि विनामास्क फिरणाऱ्यांविरुद्ध (३७) यासह अन्य गुन्हे मिळून एकूण ९८ गुन्हे दाखल करण्यात आले. रविवारीही सकाळपासूनच पोलिसांची धडक कारवाई सुरू होती.
.............................