98th Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan : कलावंतांचा टक्का यंदा तरी वाढणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 01:01 AM2018-06-14T01:01:49+5:302018-06-14T01:01:49+5:30

काही सन्माननीय अपवाद वगळता अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाकडे नाट्यसृष्टीतील कलावंत पाठ फिरवतात, असा इतिहास आहे. मात्र, यंदा मुंबईत संमेलन होत असल्याने रंगकर्मींच्या उपस्थितीचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.

98th Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan: Artists' percentages will increase this year? | 98th Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan : कलावंतांचा टक्का यंदा तरी वाढणार?

98th Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan : कलावंतांचा टक्का यंदा तरी वाढणार?

Next

- राज चिंचणकर
मुंबई  - काही सन्माननीय अपवाद वगळता अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाकडे नाट्यसृष्टीतील कलावंत पाठ फिरवतात, असा इतिहास आहे. मात्र, यंदा मुंबईत संमेलन होत असल्याने रंगकर्मींच्या उपस्थितीचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. मुंबई आणि परिसरातील नाट्यगृहांमध्ये १३ ते १५ जून या काळात प्रयोग न करण्याचा निर्णय नाट्यनिर्मात्यांनी घेतल्याने नाट्यगृहांवर संमेलनाचा पडदा पडला आहे. त्याचाही चांगला परिणाम कलावंतांच्या उपस्थितीवर होण्याची शक्यता आहे. मुंबईतील नाट्यनिर्मात्यांनी संमेलन काळात नाट्यप्रयोग रद्द करणे हे संमेलनाच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल आहे; परंतु अनेक कलाकार केवळ रंगभूमीवरच नव्हे, तर मालिका आणि चित्रपटांतही कार्यरत आहेत. रंगभूमीविषयी बांधिलकी लक्षात घेऊन संमेलनाच्या तीन दिवसांच्या काळात हे कलाकार ‘शूटिंग’कडे पाठ फिरवतात का, हे पाहणे औत्स्युक्याचे आहे. नाट्यसंमेलनाला कलावंतांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नाट्य परिषद दरवर्षी करते. संमेलनाच्या काळात नाट्यप्रयोग करू नयेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली जाते. यंदा ते सर्व जुळून आल्याने संमेलनात कलावंतांची वर्दळ पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
 

Web Title: 98th Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan: Artists' percentages will increase this year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.