रुग्ण निदानाच्या तुलनेत कोरोनामुक्त अधिक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मागील काही दिवसांच्या तुलनेत राज्यात मंगळवारी काही अंशी दिलासादायक चित्र दिसून आले. राज्यात दिवसभरात निदान झालेल्या नव्या काेराेना रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक दिसून आली. मंगळवारी ९ हजार ९२७ नवे रुग्ण आणि ५६ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या २२,३८,३९८ झाली असून, बळींचा आकडा ५३ हजार ५५६ झाला आहे.
दिवसभरात १२,१८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आतापर्यंत एकूण २०,८९,२९४ रुग्ण काेराेनामुक्त झाले. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.३४ टक्के एवढे झाले. राज्यात ९५ हजार ३२२ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
* मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी २१९ दिवसांवर
मुंबईत मंगळवारी १ हजार १२ रुग्ण आणि २ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३ लाख ३५ हजार ५८४ झाली असून, मृतांचा आकडा ११ हजार ५०६ झाला आहे. दिवसभरात १ हजार ५१ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ३ लाख १२ हजार ४५८ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांवर, तर रुग्ण दुपटीचा कालावधी २१९ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या १० हजार ७३६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
.........................